Mathura: राम जन्मभूमीनंतर आता कृष्ण जन्मभूमीचे प्रकरण पोहोचले कोर्टात; केली शाही ईदगाह मशिद हटवण्याची मागणी
मथुतेच्या कोर्टात दिवाणी खटला दाखल करून, श्रीकृष्ण विराजमान यांनी आपले जन्मस्थान रिकामे करण्याची विनंती केली आहे.
राम मंदिराच्या अयोध्या प्रकरणात विजयी झालेल्या रामलल्ला विराजमाननंतर, आता मथुरा (Mathura) मध्ये श्रीकृष्ण विराजमान (Shri Krishna Virajman) यांनीही कोर्टात धाव घेतली आहे. मथुतेच्या कोर्टात दिवाणी खटला दाखल करून, श्रीकृष्ण विराजमान यांनी आपले जन्मस्थान रिकामे करण्याची विनंती केली आहे. यामध्ये कृष्णाजन्मभूमीच्या 13.37 एकर जागेची मालकी मागितली असून, पुढे त्यांचे म्हणणे आहे की, कृष्ण जन्मभूमीच्या जमिनीवर मोगल काळात 'कब्जा’ करून तिथे एक शाही इदगाह (Shahi Idgah Masjid) बनविली होती. आता ही ईदगाह मशिद हटवण्याची मागणी याचिकेत केली आहे.
भगवान श्रीकृष्ण विराजमान, कटरा केशव देव खेवट, मौजा मथुरा बाजार शहर यांच्या वतीने त्यांचे जिव्हाळ्याचे मित्र म्हणून वकिल रंजना अग्निहोत्री व इतर सहा भाविकांनी हा दावा दाखल केला आहे. मात्र, प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट 1991(Places of Worship (Special Provisions) Act, 1991) या प्रकरणाच्या मार्गात येत आहे. या कायद्याद्वारे वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याच्या मालकी हक्काच्या खटल्याला सूट दिली होती. मात्र 1947 मध्ये अस्तित्त्वात असलेल्या धार्मिक स्थळाच्या स्थितीत बदल होण्यासंबंधी कोणत्याही अन्य कोर्टाला खटला चालण्यास बंदी घातली होती.
या कायद्यात असे म्हटले गेले आहे की 15 ऑगस्ट, 1947 रोजी जे धार्मिक स्थळ ज्या संप्रदायाचे आहे ते, आज व भविष्यामध्येही त्याच संप्रदायाचे राहील. अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यापासून, आता एक पक्ष काशी आणि मथुरा प्रकरणात सातत्याने एकत्र येत आहे. याच अनुक्रमे काही दिवसांपूर्वी प्रयागराजमधील अखिल भारतीय अखाड़ा परिषदेच्या बैठकीत साधू-संतांनी मथुरामधील कृष्णा जन्मभूमी आणि काशी विश्वनाथ मंदिराबद्दल चर्चा केली होती. (हेही वाचा: बिहारमध्ये 'चेटकीण' समजून महिलेची गोळ्या घालून हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल)
दरम्यान, इतिहासकार जदू नाथ सरकारचा हवाला देत या ठिकाणच्या इतिहासाचा मागोवा घेत फिर्यादी नमूद करतात की,1969-70 मध्ये औरंगजेबाने कटरा केशवदेव येथील श्रीकृष्णाच्या जन्माचे श्रीकृष्ण मंदिर उद्ध्वस्त केले आणि एक इमारत बांधली गेली आणि त्याला ईदगाह मस्जिद असे म्हणतात.