यमुना एक्स्प्रेस वेवर गॅस टँकरचा भीषण स्फोट ; 5 वाहनं जळून खाक
दिल्ली आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या यमुना एक्सप्रेस वेवर आज पहाटेच्या सुमारास गॅस टँकरचा स्फोट झाला.
दिल्ली आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या यमुना एक्सप्रेस वेवर आज पहाटेच्या सुमारास गॅस टँकरचा स्फोट झाला. एका गॅस टँकरने दुसऱ्या गॅस टँकरला धडक दिल्याने हा स्फोट झाला. स्फोटाच्या आगीत एक्सप्रेस वेवरुन जाणारी इतर 5 वाहनं देखील जळून खाक झाली. या दुर्घटनेत तीनजण गंभीर जखमी झाल्याचे समोर येत आहे.
यमुना एक्स्प्रेस वे हा सर्वात व्यस्त मार्ग असून या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून अग्निशामक दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
यमुना एक्सप्रेस वेवरील अपघातांची मालिका सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वीच एका खाजगी बस आणि ट्रकच्या धडकेत 4 जणांचा मृत्यू झाला होता. तर 13 जण जखमी झाले होते.
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement