
Ahmedabad Plane Crash Update: गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाचे विमान कोसळले. एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान सुमारे 242 प्रवाशांना घेऊन लंडनला जात होते आणि उड्डाणानंतर अवघ्या दोन मिनिटांतच ते कोसळले. बीजे मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या इमारतीवर हे विमान कोसळले. मेघानी नगरमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या यूजी हॉस्टेल मेसवर विमान थेट कोसळल्याने या घटनेत अनेक एमबीबीएस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुःखद घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. तथापि, सोशल मीडियावर असे म्हटले जात आहे की विमान अपघाताच्या वेळी अनेक पदवीपूर्व एमबीबीएस विद्यार्थी वसतिगृहात राहत होते. त्यापैकी अनेकांचा मृत्यू किंवा गंभीर जखमी होण्याची भीती आहे.
दरम्यान, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (FAIMA) ने या अपघातानंतर ट्विट केलं आहे. या पोस्टमध्ये FAIMA ने म्हटलं आहे की, अहमदाबादमध्ये विमान कोसळल्याच्या बातमीने आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे.! बीजेएमसी, वसतिगृहात विमान कोसळल्याने अनेक एमबीबीएस विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आम्ही परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहोत आणि कोणत्याही मदतीसाठी तयार आहोत! (हेही वाचा - Air India Plane Crash: अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कसे कोसळले? समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ)
फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनची पोस्ट -
We are deeply shocked about the news of AI ✈️ , crashing in Ahmedabad. !
News have become more gruesome after finding out that flight had crushed in BJMC, Hostel & many MBBS students have also been injured!!!!
We are monitoring the situation closely & are ready for any help! pic.twitter.com/gZ4vQwy34P
— FAIMA Doctors Association (@FAIMA_INDIA_) June 12, 2025
दरम्यान एअर इंडियाच्या विमानात 242 प्रवासी होते. या विमान अपघाताचे भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. विमान कोसळल्यानंतर अपघातस्थळावरून काळा धूर निघत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. अनेक व्हिडिओंमध्ये विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकून कोसळल्याचे देखील दिसून आले आहे. (हेही वाचा - Vijay Rupani: एअर इंडियाच्या AI171 विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी प्रवासी असल्याचे वृत्त)
तथापि, विमान अपघातानंतर वसतिगृहात लोक आणि इतर बचाव अधिकारी बचाव कार्य करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचल्या असून जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. तथापि, विमान अपघातासंदर्भातील अपडेटनुसार, विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.