Mann Ki Baat: मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता देशाला संबोधित करणार, 'या' मुद्द्यांवर बोलण्याची शक्यता
Mann Ki Baat: देशभरातील शेतकऱ्यांमध्ये कृषि बिलावरुन संताप व्यक्त केला जात आहे. हजारोंच्या संख्येने शेतकरी राजधानी दिल्लीत पोहचले आहेत. याच स्थितीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) त्यांच्या मन की बात मधून देशाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी मोदी यांनी नागरिकांनी आपले विचार द्यावेत असे आवाहन ही केले होते. त्यामुळे आजच्या मन की बात कडे सर्व देशवासियांचे लक्ष असणार आहे.(Most Popular Politician; पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले देशातील सर्वाधिक लोकप्रिय राजकारणी; जाणून घ्या त्यांची Brand Value)
आजची ही तिसरी वेळ आहे ज्यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनादरम्यान नरेंद्र मोदी मन की बात मधून आपले मत देशवासियांसमोर मांडणार आहे. सप्टेंबर महिन्यात फार्म बिल पास झाल्यानंतर ही मन की बातचा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी ही हरियाणा आणि पंजाब मधील शेतकऱ्यांनी याचा विरोध केला होता.
पीएम मोदी त्यांच्या कार्यकाळापासूनच रेडियो कार्यक्रम मन की बात मधून जनेतेसोबत विविध मु्द्यांवरील आपले मत व्यक्त करतात. त्याचसोबत नागरिकांनी यासाठी आपली ही मत द्यावी असे सांगितले जाते. मन की बात 2.0 चा 18 एपिसोड प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे एकूण 71 एपिसोड पूर्ण झाले आहेत. यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी 25 ऑक्टोंबरला मन की बातच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले होते.(PM Narendra Modi Meeting Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह बैठक, 'या' मुद्यांवर होऊ शकते चर्चा)
आजच्या मन की बात मधून शेतकऱ्यांच्या मुद्द्यासह कोरोनावरील लसीसंदर्भातील माहिती देऊ शकतात. तर शनिवारी नरेंद्र मोदी यांनी देशातील तीन बड्या कोरोना वॅक्सीन सेंटरचा दौरा केला होता. तसेच कोरोनावरील लसीच्या विकासासंदर्भात आढावा घेतला.