Mann Ki Baat: नरेंद्र मोदी आज 11 वाजता देशाला संबोधित करणार; कुठे ऐकाल 'मन की बात' कार्यक्रम?
सध्या नरेंद्र मोदी भारताबाहेर आहेत. काल युएईमध्ये ऑर्डर ऑफ जायद जा युएईमधील सर्वोच्च नागरी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आता ते बहरीनमध्ये आहेत. सध्याच्या त्यांच्या दौर्यानुसार मोदी 26 ऑगस्टला भारतामध्ये परतणार आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (25 ऑगस्ट) दिवशी 'मन की बात' (Mann Ki Baat)या कार्यक्रमामधून सकाळी 11च्या सुमारास भारतीयांशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतात. ऑल इंडिया रेडिओ आणि डीडी नॅशनल, डीडी न्यूज, डीडी भारतीच्या माध्यमातून हा रेडिओ प्रोग्राम भारतीयांना लाईव्ह ऐकता येणार आहे. पुन्हा पंतप्रधान पदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदी यांचा आजचा तिसरा 'मन की बात' कार्यक्रम प्रसारित होणार अहे. सध्या नरेंद्र मोदी भारताबाहेर आहेत. काल युएईमध्ये ऑर्डर ऑफ जायद जा युएईमधील सर्वोच्च नागरी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आता ते बहरीनमध्ये आहेत. सध्याच्या त्यांच्या दौर्यानुसार मोदी 26 ऑगस्टला भारतामध्ये परतणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा Order of Zayed या UAE च्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव
'मन की बात' चा पहिला कार्यक्रम लोकसभा 2019 निवडणूक निकालांवर आधारित होता. त्यावेळेस मोदींनी आणीबाणी, पाणीसंकटांवर चर्चा केली होती. दुसर्या 'मन की बात' मध्ये त्यांनी लोकांना जम्मू कश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यापूर्वीची त्यांची भूमिका सांगितली होती. देशात नकारात्मक, हिंसक शक्तींना स्थान दिले जाणार नाही असा सज्जड दम त्यांनी भरला होता.
PMO Tweet
मागील काही दिवसांमध्ये भाजपाने सुषमा स्वराज आणि अरूण जेटली हे त्यांचे दोन खंदे नेते गमावले आहेत. काल बहरीनमध्येही बोलताना त्यांनी अरूण जेटलींबद्दल असलेले भावनिक बंध उलगडत मनातील भावना मोकळ्या केल्या आहेत. आज मोदी भारतीयांना उद्देशून काय सांगणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहेत.