IPL Auction 2025 Live

Manish Sisodia Administered Plasma Therapy: मनीष सिसोदिया यांच्यावर प्लाझ्मा थेरपी; डेंग्यू आणि कोरोना संक्रमित झालेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मॅक्स रुग्णालयात दाखल

मनीष सिसोदिया (Photo Credits-PTI)

भारतात कोरोना व्हायसरचे थैमान कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. उलट दिवसागणिक रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे की, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली आहे. यापूर्वी सिसोदिया यांना राजधानी दिल्ली मधील लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नंतर मॅक्स रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.(Coronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 56 लाखाच्या पार; मागील 24 तासांत 83,347 नव्या रूग्णांची भर)

डेंगू आणि कोरोनाने संक्रमित झालेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. ते राजधानी दिल्लीतील साकेत स्थित असलेल्या मॅक्स रुग्णालयात दाखल झाले आहे. यापूर्वी गुरुवारी अशी बातमी समोर आली होती की, सिसोदिया यांना डेंग्यू सुद्धा झाला होता. तसेच ब्लड प्लेटलेट्स कमी होत आहेत.(COVID-19 Vaccine Update: कोविड19 वरील लसची चाचणी दुसऱ्या टप्प्यात, पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत मिळण्याची शक्यता- एम्स कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंट प्रमुख डॉ. संजय राय)

 ANI Tweet: 

दरम्यान, सिसोदिया यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली होती. दिल्लीचे उपमुख्यमंत्री यांनी असे म्हटले होते की, हलक्या स्वरुपाचा ताप आल्याने मी कोरोनाची चाचणी केली. त्यावेळी चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. तर 14 सप्टेंबर पासून सिसोदिया यांना कोरोनाची लागण झाली आहे.