केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भविष्यवाणी, भाजप-शिवसेना युतीला महाराष्ट्रात 240-250 जागांवर विजय मिळवणार

तसेच 21 ऑक्टोंबरला महाराष्ट्र आणि हरियाणा येथे निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभुमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एक भविष्यवाणी केली आहे.

Ramdas Athawale | (Photo Credits-Facebook)

आगामी विधानसभा निवडणूकीच्या (Assembly Elections) तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये घौडदौड सुरु झाली आहे. तसेच 21 ऑक्टोंबरला महाराष्ट्र आणि हरियाणा येथे निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभुमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एक भविष्यवाणी केली आहे. राम आठवले यांनी शनिवारी मीडियासोबत बोलताना असे म्हटले आहे की, विधानसभा निवडणूकीत भाजप-शिवसेना युतीला महाराष्ट्रात 240-250 जागांवर विजय मिळवता येणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेसाठी 288 जागा आहेत. तर रामदास आठवले यांनी असे ही म्हटले आहे की, शिवसेने भाजपसोबत काही छोट्याछोट्या मुद्द्यांवरुन मतभेद करणे टाळावे. तर स्वत:च्या ताकदीवर जागा वाटपाचा फॉर्म्युल्याचा निर्णय घ्यावा. तसेच भाजप-शिवसेना युती यावेळच्या निवडणूकीसाठी सुद्धा एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आठवले यांनी एक विधान करत असे म्हटले की, महायुती मध्ये (लहान) मित्रपक्षाला 18 जागा देण्यात येणार आहेत. यामधील 10 जागा रिपाई (ए) लढवणार आहे.(रामदास आठवले यांची विनोदी कविता ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी खळखळून हसले)

तसेच आठवले यांनी रिपाईला महाराष्ट्रातील पुढील सरकारमध्ये एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री पद मिळावी अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी सुद्धा रामदास आठवले यांनी 10 जागांची मागणी केली होती. आपण शिवसेना भाजपा युतीसोबत राहणार आणि राज्यात विधानसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवणार असा विश्वासदेखील व्यक्त केला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif