Supriya Sule On Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज; सुप्रिया सुळेंची थेट लोकसभेत मागणी

गेल्याच आठवड्यात राज्यात अवकाळी पाऊस झाला. यावेळी शेतकऱ्यांचे तसेच सामान्य नागरिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात यावर्षी नेहमीच्या तुलनेत पाऊस देखील कमी झाल्याने पिकांचे उत्पादन देखील कमी झाले आहे.

आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (Parliament Winter Session 2023) सुरुवात झाली. पहिल्याचा दिवशी सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत (Lok Sabha) मांडल्या आहेत. कधी दुष्काळ (Drought) तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून, त्यांना केंद्राने तत्काळ मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असून, जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज देण्याची मागणी सुळे यांनी केली आहे. महाराष्ट्र आणि माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.  (हेही वाचा - Sunetra Pawar: बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार सामना रंगणार?, 'भावी खासदार'म्हणून पोस्टरवर उल्लेख)

पाहा पोस्ट -

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे बँकेतून त्यांना कर्ज दिले पाहिजे. सोबतच हवामान बदलाचा देखील त्यांना फटका बसत असून, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. आपल्यावर जेव्हा संकट येते त्यावेळी शेतकरी मदतीला धावून येत असतो. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

गेल्याच आठवड्यात राज्यात अवकाळी पाऊस झाला. यावेळी शेतकऱ्यांचे तसेच सामान्य नागरिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात यावर्षी नेहमीच्या तुलनेत पाऊस देखील कमी झाल्याने पिकांचे उत्पादन देखील कमी झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement