Baby Born With Two Heads: मध्य प्रदेश मध्ये दोन डोकी, तीन हात असलेल्या बाळाचा जन्म

Brijesh Lahoti यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळ जन्माला आलेल्या या स्थितीला Dicephalic Parapagus म्हणून ओळखलं जातं. ही partial twinning मधील एक दुर्मिळ अवस्था आहे.

Credits: Youtube

मध्य प्रदेशच्या (Madhaya Pradesh)  रतलम (Ratlam)  मध्ये एका महिलेने दोन डोकी, तीन हात असलेल्या मुलाला जन्म दिला आहे. ही घटना 29 मार्चची आहे. दोन चेहर्‍याच्या मागे तिसरा हात आहे. रिपोर्ट्सनुसार, नवजात बालक इंदौरच्या (Indore) महाराजा यशवंतराव हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. रतलम कडून रेफर केलेल्या या बाळाला हॉस्पिटलच्या NICU मध्ये दाखल केले आहे. पुढे त्याच्यावर उपचार केले जाणार आहे. जौराच्या नीम चौकची राहणारी शाहीन बी ने सोमवारी संध्याकाळी रतलम जिल्ह्यात हॉस्पिटल मध्ये जन्म दिला आहे.

Pediatric Surgeon Dr. Brijesh Lahoti यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळ जन्माला आलेल्या या स्थितीला Dicephalic Parapagus म्हणून ओळखलं जातं. ही partial twinning मधील एक दुर्मिळ अवस्था आहे. हे देखील नक्की वाचा: आश्चर्य! जुळ्या भावंडांचे अवघ्या 15 मिनिटांच्या फरकामुळे बदलले जन्मवर्ष, जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण .

डॉ. लाहोटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा परिस्थितीमध्ये जन्माला आलेली बाळं सुरूवातीच्या टप्प्यांत सांभाळणं कठीण असतं. सध्या बाळावर कोणतीही शस्त्रक्रिया ठरवलेली नाही. सोनोग्राफी मध्ये डॉक्टरांनी ही मुलं जुळं असतील असं सांगितलं होतं.त्यावेळेस डॉक्टरांच्या स्थितीची पूर्ण कल्पना नव्हती. Dr. Naved Qureshi, SNCU in charge of the hospital ने दिलेल्या माहितीनुसार, मुलांची स्थिती चिंताजनक आहे. सध्या