Madhya Pradesh: अंधश्रद्धेचा कळस! नवस फेडण्यासाठी 25 वर्षीय महिलेने देवीसमोर कापली आपली जीभ; नातेवाईकांचा रुग्णालयात नेण्यास नकार
काळात अनेक भक्त देवीपुढे आपल्या इच्छा-आकांक्षा व्यक्त करतात. ज्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात, ते देवीसमोर आपला नवस फेडतात.
नवरात्रीच्या (Navratri) या नऊ दिवसांमध्ये संपूर्ण देशात देवीचा जागर होतो. काळात अनेक भक्त देवीपुढे आपल्या इच्छा-आकांक्षा व्यक्त करतात. ज्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात, ते देवीसमोर आपला नवस फेडतात. अशा भक्तांमध्ये असेही काही भक्त आहेत, जे या भक्तीमध्ये इतके तल्लीन झाले आहेत की त्यांना श्रद्धा व अंधश्रद्धा (Superstition) यामधील फरकही समजून येत नाही. मध्यप्रदेशमध्ये (Madhya Pradesh) एका 25 वर्षीय महिलेने तिची जीभ (Tongue) कापून मैहर येथील देवी शारदाच्या (Maihar Maa Sharda Devi) मंदिरामध्ये देवीच्या चरणी अर्पण केली आहे.
ही घटना सोमवारी घडल्याचे सांगितली जात आहे, त्यानंतर मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला. रमा बन्सल असे या महिलेचे नाव आहे, ती रायगड पोलीस स्टेशन देवेंद्र नगर जिल्हा पन्ना येथील रहिवासी आहे. आपला नवस पूर्ण झाल्यावर रमाने देवी शारदाच्या मंदिरामध्ये आपली जीभ कापली. त्यानंतर तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ नरेश निगमने यांनी सांगितले आहे की, सध्या महिलेची प्रकृती ठीक असून, तिच्या जीवाला कोणताही धोका नाही.
महत्वाचे म्हणजे आई शारदासमोर आपली जीभ कापल्यानंतर रमाच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले नाही, तर कुटुंबातील सदस्यांनी तिला मंदिराच्या आवारात झोपवले आणि भजन-कीर्तन सुरु केले. जेव्हा ही माहिती पोलिसांपर्यंत पोहचली, तेव्हा तात्काळ पोलीस मंदिर परिसरात आले आणि त्यांनी कुटुंबीयांना समजावून सांगितले, त्यानंतर त्यांनी महिलेला रुग्णालयात नेले. परंतु त्यावेळीही कुटुंबीयांनी आरती केल्याशिवाय निघणार नाही असे ठामपणे सांगितले. अशाप्रकारे जीभ कापल्यानंतर तब्बल दोन तास महिला मंदिरामध्ये होती. (हेही वाचा: आंध्रप्रदेश मध्ये दसरा निमित्त मंदिराला चलनी नोटांच्या मदतीने सजावट; 5 कोटी पेक्षा अधिक रूपयांचा वापर)
दरम्यान, मैहर हे मध्य प्रदेश राज्यातील सतना जिल्ह्यात वसलेले शहर आहे. मैहर या शब्दाचा अर्थ, ‘आईच्या गळ्यातील हार’ असा होतो. या ठिकाणाचे देवी शारदाचे मंदिर खूप लोकप्रिय आहे.