IPL Auction 2025 Live

Madhya Pradesh Shocker: नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून आधी 4 बायकांनी सोडले; पाचव्या पत्नीने झोपेची गोळी देऊन कापले गुप्तांग

तो दारू पिऊन सतत तिच्याशी भांडायचा. याच त्रासाला कंटाळून तिने 21 फेब्रुवारी रोजी त्याच्या रात्रीच्या जेवणात झोपेच्या 20 गोळ्या मिसळल्या. पती गाढ झोपेत गेल्यानंतर तिने त्याच्या मानेवर कुऱ्हाडीने अनेक वार केले.

Muder प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिंगरौली जिल्ह्यातील उर्ती गावात पत्नीने आपल्या पतीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुमारे 12 दिवसांपूर्वी झालेल्या या खुनाचा गुरुवारी पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. आरोपी महिलेने पतीची हत्या करून मृतदेह जंगलात फेकून दिला होता. पोलिसांच्या चौकशीत हा हत्येचे कारणही समोर आले आहे. या घटनेसंदर्भात मयताची पत्नी कांचन गुर्जर हिने पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन, अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

तेव्हापासून पोलीस खून प्रकरणाचा उलगडा करण्यात गुंतले होत. पोलिसांनी मृताच्या अनेक नातेवाईकांवर संशय घेऊन त्यांची चौकशी केली. तपासादरम्यान पोलिसांना मृताच्या या पत्नीवर संशय आल्याने तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला कांचन उडवाउडवीची उत्तरे देत राहिली. तिने पतीच्या हत्येतील आपला सहभाग नाकारला होता. मात्र पोलिसांनी कडक चौकशी केली असता तिने संपूर्ण घटना सांगितली.

कांचनने पोलिसांना सांगितले की, तिच्या पतीला दारूचे व्यसन होते. तो दारू पिऊन सतत तिच्याशी भांडायचा. याच त्रासाला कंटाळून तिने 21 फेब्रुवारी रोजी त्याच्या रात्रीच्या जेवणात झोपेच्या 20 गोळ्या मिसळल्या. पती गाढ झोपेत गेल्यानंतर तिने त्याच्या मानेवर कुऱ्हाडीने अनेक वार केले, तसेच त्याचे गुप्तांगही कापले. यामध्ये पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर कांचनने मृतदेह कापडात गुंडाळून जंगलात फेकून दिला. नंतर तिने त्याचे कपडे आणि चप्पल पेटवून दिली. (हेही वाचा: कलयुगी आईने सॅनिटायझर टाकून पोटच्या मुलीला जिवंत जाळले; जाणून घ्या काय होता चिमुरडीचा गुन्हा)

या घटनेची माहिती देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिवकुमार वर्मा यांनी सांगितले की, मयत आपल्या पत्नीशी नेहमी तिच्याशी भांडायचा, तिला मारहाण करायचा. पत्नीच्या चारित्र्यावरही त्याला संशय होता. या त्रासातून मुक्त होण्यासाठी कांचनने त्याची हत्या केली. कांचन ही मृत वीरेंद्र गुर्जर याची पाचवी पत्नी असल्याचे पोलिसांनी सांगितले. वीरेंद्रच्या छळाला कंटाळून आधी त्याच्या चार पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या.