वोटिंग वेळी जन्मला म्हणून मुलाचे नाव ठेवले 'मतदान'

व्यक्तिने वोटिंगच्या वेळेस नवजात मुलगा जन्माला आल्याने त्याचे नाव चक्क 'मतदान'(Matdaan) ठेवण्यात आले आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एक व्यक्ती 120 किमी लांब प्रवास करत वोटिंग(Voting) करण्यास गेला. तसेच आपले अमूल्य मत फुकट जाऊ नये म्हणून एका सुजाण नागरिकाची भूमिका त्याने पार पाडली आहे. मात्र या व्यक्तिने वोटिंगच्या वेळेस नवजात मुलगा जन्माला आल्याने त्याचे नाव चक्क 'मतदान'(Matdaan) ठेवले आहे.

संतोष असे या व्यक्तीचे नाव असून 28 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात वोटिंग ठेवण्यात आले होते. तर संतोषची पत्नी गर्भवती असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वोटिंगसाठीचे ठिकाण हे रुग्णालयापासून 120 किमी दूर होते. मात्र संतोष हे अंतर पार करत वोटिंग करण्यासाठी पोहचला. तसेच वोटिंग करण्यासाठी उभ्या असेल्या लोकांच्या रांगेत पुढे पुढे जाऊ लागला. तर संतोषला आपल्या गर्भवती बायकोची चिंता सतावत होती. परंतु अखेर संतोषने मतदान केले. त्याचवेळी पळत जाऊन त्याने पुन्हा रुग्णालय(Hospital) गाठले. त्यावेळी बायकोने एका नवजात मुलाला(New Born Baby) जन्म दिला होता. हे पाहून संतोषचा आनंद अनावर होऊन मुलाचे चक्क 'मतदान' हे नाव त्याने ठेवले.

संतोषला या प्रकरणी विचारले असता त्याने, 'माझ्या मुलाचे नाव मतदान का ठेवले याचे कारण सांगितले. तसेच शाळेत प्रवेश घेताना मुलाच्या नावावरुन अडचणी आल्यास त्याचे नाव बदलले जाईल' असे ही संतोषने स्पष्ट केले आहे. तर प्रत्येक नागरिकाने मतदान करुन सुजाण नागरिकाची भूमिका पार पाडायला हवी असे त्याने सर्व नागरिकांना आवाहन केले.