मध्यप्रदेश: व्याभिचाराच्या आरोपांवरून पत्नीच्या गुप्तांगांमध्ये घुसवले मोटारसायकलचं प्लॅस्टिक ग्रिप; जटील शस्त्रक्रियेने वाचवले महिलेचे प्राण

Arrest | Representational Image | Photo Credits: File Photo

मध्य प्रदेशामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका पुरूषाने पत्नीच्या गुप्तांगामध्ये मोटारसायकलच्या हॅन्डलचं प्लॅस्टिक ग्रिप घुसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. या आरोपावरूच त्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मागील दोन वर्षांपासून या नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत होती.

मध्य प्रदेश राज्यातील स्थानिक सरकारी महाराजा यशवंतराव हॉस्पिटलमध्ये महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून प्लॅस्टिक ग्रिप काढण्यात आलं. हे ग्रिप 30 वर्षीय महिलेच्या शरीरात गर्भाशय आणि आतड्यांपर्यंत आत घुसवले होते.

MY Hospital कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गर्भाशयाजवळ प्लॅस्टिक ग्रिप पोहचल्याने संबंधित स्त्रीच्या शरीरात इंफेक्शन पसरले आहे. योग्य वेळी शस्त्रक्रिया झाली नसती तर ते शरीरात इतरअवयवांपर्यंत पोहचण्याची शक्यता होती.

प्रकाश भिल असं आरोपी नवर्‍याचं नाव आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यामधील वैयक्तिक संबंध ताणले गेले होते. या प्रकारानंतर वेदना असह्य झाल्यानंतर तिने याविषयी वाच्यता केल्याची चंदन नगर पोलिस स्टेशनचे इनचार्ज राहुल शर्मा यांनी सांगितले आहे.