Coronavirus: मध्य प्रदेश सरकारकडून नव्या गाईडलाइन्स जाहीर, महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांना 7 दिवस क्वारंटाइन रहावे लागणार

कोरोनाच्या रुग्णांवर नियंत्रण मिळावे यासाठी त्यांनी आता महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात येणाऱ्या नागरिकांना सात दिवस क्वारंटाइन रहावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI/IANS)

Coronavirus: मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता तेथील सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेत नव्या गाईडलाइन्स जाहीर केल्या आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर नियंत्रण मिळावे यासाठी त्यांनी आता महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात येणाऱ्या नागरिकांना सात दिवस क्वारंटाइन रहावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचसोबत गाईडलाइन्समध्ये असे सुद्धा सांगण्यात आले आहे की, दुकानांच्या बाहेर सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन केले जावे. तर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाटी टीम नाइट कर्फ्यू बद्दल निर्णय घेतील.

तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वेगाने वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात 16,620 नव्या रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. हे यंदाच्या वर्षातील एकाच दिवसातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. मध्य प्रदेशाची सीमा ही महाराष्ट्राला लागूनच आहे. त्यामुळेच राज्यातील शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.(BSP चीफ मायावती यांनी घेतली कोरोनाची लस, सरकारसह लोकांना केले 'हे' खास अपील)

दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशात सु्द्धा रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. रविवारी राज्यात नव्याने 743 रुग्णांची नोंद झाल्याने एकूण आकडा 2 लाख 68 हजार 594 वर पोहचला आहे. तसेच आतापर्यंत मध्य प्रदेशात कोरोनामुळे 3997 जणांचा बळी गेला आहे.(Covid-19 Cases in India: देशातील 'या' 6 राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची वाढ अधिक; नियमांचे पालन करण्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे आवाहन) 

मध्य प्रदेशातील एका आरोग्य अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, रविवारी कोडिव19 चे 263 रुग्ण हे इंदोर, भोपाल मधून 139 आणि जबलपूर मधून 45 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा एकूण 2 लाख 68 हजार 594 वर पोहचला आहे.  यापैकी 2 लाख 59 हजार 987 जणांनी कोरोनावर मात केली आहे.तर 4740 रुग्णांवर विविध रुग्णालयात अद्याप उपचार सुरु आहे.  रविवारी 513 जणांनी कोरोनावर मात केली आहे.