IPL Auction 2025 Live

मध्य प्रदेश मध्ये भाजपची सत्तावापसी; शिवराज सिंह चौहान आज चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

मुख्यमंत्री कमलनाथ (CM Kamalnath) यांनी पदाचा राजीनामा दिल्यानांतर आज संख्याबळ सिद्ध करून भाजपचे शिवराज सिंह चौहान (Shivrajsingh Chouhan) हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

Shivraj Singh Chouhan (Photo Credits: Twitter)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh)  मध्ये 9 मार्च पासून सुरु असणाऱ्या राजकीय सत्ता नाट्यावर अखेरीस आज पडदा पडणार आहे. मुख्यमंत्री कमलनाथ (CM Kamalnath) यांनी पदाचा राजीनामा दिल्यानांतर आज संख्याबळ सिद्ध करून भाजपचे शिवराज सिंह चौहान (Shivrajsingh Chouhan) हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे मध्य प्रदेश मध्ये चौहान यांची चौथ्यांदा मुख्यमंत्री म्ह्णून नेमणूक होणार आहे. भोपाळ येथील राजभवनात राज्यपाल लालजी टंडन (Lalji Tandon) यांच्या समक्ष रात्री 9 वाजता शिवराज सिंह चौहान शपथ घेतील अशी माहिती आहे. आज काही वेळापूर्वी भाजपच्या नेते मंडळींची मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींवर आधारित बैठक पार पडली त्यांनंतर याबाबत अधिकृत घोषणा माध्यमांच्या समोर करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, काँग्रेसचे युवा फळातील नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी 9 मार्च रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यांच्यासोबतच अन्य 22 आमदारांनी सुद्धा काँग्रेसला (MP Congress) सोडचिठ्ठी दिली होती, यामुळे एका पाठोपाठ एक कमलनाथ सरकारचा पाया कोसळत चालला होता, आपल्याकडे बहुमत आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना 20 मार्च रोजी विश्वासदर्शी ठरावाला सामोरे जायचे होते, मात्र बहुमत चाचणीच्या अगोदरच कमलनाथ यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. मध्य प्रदेश मध्ये कॉंग्रेस चे सरकार कोसळले;  ऑपरेशन लोटस 15 महिन्यातच यशस्वी

यानंतर भाजपकडे 107 आमदारांचे संख्याबळ आहे असे सांगत भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी दावा करण्यात आला, सुरुवातीला शिवराजसिंह चौहान आणि नरेंद्रसिंह तोमर यांच्या नावात चर्चा होती मात्र आता चौहान हेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट झाले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, मध्ये प्रदेश मध्ये सलग 15 वर्षे भाजपची सत्ता होती, मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवत आपली सत्ता स्थापन केली होती मात्र त्यांनतर नाराज आमदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडखोरीमुळे 15 महिन्यातच काँग्रेसला सत्तेपासून दूर व्हावे लागले. परिणामी, भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी झाले आहे.