लखनऊ: लुंगी नेसून ट्रक चालविणे पडणार महागात, ट्रकचालकास भरावा लागणार 2000 रुपयांचा दंड
त्यामुळे लुंगी नेसण्यावर बंधन आल्या कारणाने ट्रकचालकांच्या पेहरावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशात हा नियम लागू करण्यात आला आहे.
वाहन चालवताना प्रत्येक वाहन चालकाचा काही ठराविक पोशाख ठरलेला असतो. त्याला कारण म्हणजे त्यांना वाहन चालवताना ज्या पोशाखात सोयीस्कर वाटते असा पोशाख घालून ते दुचाकी, चारचाकी चालविणे पसंत करतात. यात ट्रकचालकांचा (Truck Driver) सर्वात आवडीचा पोशाख असतो तो लुंगी परिधान करणे. मात्र आता लुंगी नेसून ट्रक चालविल्यास ट्रकचालकांना 2000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे लुंगी नेसण्यावर बंधन आल्या कारणाने ट्रकचालकांच्या पेहरावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशात हा नियम लागू करण्यात आला आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार, चालकांना ड्रेस कोडचे पालन करावे लागते. मात्र आतापर्यंत या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले नव्हते. थोडक्यात हे नियम योग्यरित्या अमलात आले नव्हते. मात्र आता या नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे. हेही वाचा-
आता नवीन नियमांनुसार, ट्रकचालकांनां फुल पँट आणि शर्ट किंवा टीशर्ट घालूनच आपल्याला गाडी चालवणे बंधनकारक राहणार आहे. उत्तर प्रदेश पाठोपाठ आता महाराष्ट्रातही हा नियम लागू होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी नवीन 'मोटार वाहतूक कायद्या' (Motor Vehicle Act) नुसार, चप्पल (Slipper) किंवा सँडल (Sandals) घालून दुचाकी चालविणा-यांसही भुर्दंड भरावा लागणार असा नियम लागू करण्यात आला.
मोदी सरकारच्या या निर्णयामुळे विरोधकांकडून कडाडून टीका होत आहे. यात समाजवादी पक्षाचे राष्ट्री प्रवक्ते आय.पी. सिंह ने असे ट्विट केले आहे की, माझ्या सर्व गरीब बंधू-भगिनींनो सावध व्हा. आता गावातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी आता चप्पल घालून दुचाकी वाहन चालवू शकणार नाही. मोदी सरकारमध्ये आता सूट-बूटात बाइक चालवावी लागेल नाहीतर जोगी बाबांचे पोलीस तुमच्यावर दंड आकारेल.