Lucknow Shocker: वैवाहिक वादामुळे संतप्त झालेल्या नवऱ्याने बायकोला इमारतीच्या 8 व्या मजल्यावरुन फेकले

परंतु दोघांमधील वाद टोकाला गेल्यास कोण काय पाऊल उचलेल हे सांगता येत नाही. याच पार्श्वभूमीवर एका नवरा-बायकोमध्ये ऐवढे कडाक्याचे भांडण झाले आणि त्याने चक्क आपल्या पत्नीला इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन खाली फेकले.

Relationship (Photo Credits: PixaBay)

Lucknow Shocker: नवरा-बायकोचे भांडण हे नेहमीच होत असते. परंतु दोघांमधील वाद टोकाला गेल्यास कोण काय पाऊल उचलेल हे सांगता येत नाही. याच पार्श्वभूमीवर एका नवरा-बायकोमध्ये ऐवढे कडाक्याचे भांडण झाले आणि त्याने चक्क आपल्या पत्नीला इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन खाली फेकले. पीडित महिला नितू ही जागच्या जागीच मृत पावली.(Dog Rape in Ghaziabad: कुत्र्यावर बलात्कार; सासऱ्याच्या कृत्याचा सुनेकडून भांडाफोड, पोलिसांकडून आरोपीला अटक)

रिपोर्ट्सनुसार, नितू हिने संजीव कुमार याच्या सोबत 2011 रोजी लग्न केले. त्यांना दोन मुले असून एक 7 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षाचा मुलगा आहे. पोलिसांनी असे म्हटले की, त्या दोघांमध्ये सोमवारी जोरात भांडण झाले. तेव्हा संतप्त झालेल्या संजीवने तिला घराच्या बाल्कनीतून खाली फेकले.

संजीव हा एका कंपनीत फान्सनशीर म्हणून काम करतो. तर नितू ही घरीच असते. नितू हिचा भाऊ राजकिरण याने संजीवच्या विरोधात आरोप लावत असे म्हटले की, त्याचे एक्स्ट्रा मॅरिटयल अफेअर गेल्या तीन वर्षांपासून सुरु आहे. राजकिरण याने पुढे असे ही म्हटले की, बहिणीकडून नवऱ्याच्या या रिलेशनशिपला नेहमीच विरोध केला जात होता. परंतु संजीव याने असा दावा केला की, ती महिला ही त्याची बहिण असून ती काही वेळा घरी सुद्धा येऊन गेली आहे.(Rajasthan Crime: राजस्थानमध्ये प्रियकरावरुन पती रोज भांडायचा, पत्नीने गळा आवळून केली हत्या)

संजीव याने नंतर नितूला सांगितले की, जेव्हा तो दिल्लीत होता तेव्हा तो एका महिलेसोबत एकाच घरात दोन महिने राहिला होता. त्याच्या बहिणीला हे कळल्याचे राजकिरण याने सांगितले. त्याने पोलिसांना पुढे असे सांगितले, संजीव आणि नितूमध्ये भांडण झाल्यानंतर त्याने त्याच्याच दोन मुलांच्या समोर तिला घराच्या बाल्कनीतून खाली फेकले.

स्टेशन हाउस ऑफिसर गोसाईगंज शैलेंद्र गिरी यांनी असे म्हटले की, आम्हाला पीडित महिलेच्या भावाकडून संबंधित घटनेची तक्रारी मिळाली. संजीव याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात हत्या आणि स्री सोबत क्रुर वर्तवणूक केल्याने तुरुंगात पाठवण्यात आले आहे.