लखनौ: हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन यांच्यावर गोळ्या झाडून हत्या

रंजीत बच्चन हे सकाळी वॉकला गेले असता त्यावेळी बाईकस्वरांनी पाठून येत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

रंजित बच्चन (Photo Credits-Twitter)

राजधानी लखनौ येथील हजरतगंज परिसरात रविवारी सकाळी आंतरराष्ट्रीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन (Ranjeet Bachchan) यांची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. रंजीत बच्चन हे सकाळी वॉकला गेले असता त्यावेळी बाईकस्वरांनी पाठून येत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्याच क्षणी बच्चन यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु करण्यात आला असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

रंजीत बच्चन हे हजरतगंजच्या ओसीआर बिल्डिंग मध्ये राहत होते. खरंतर बच्चन मुळ गोरखपूर येथील रहिवाशी होते. समाजवादी पक्षाचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा ते करत असत. बाईकस्वरांनी त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून घटनास्थळावरन पसार झाले आहेत. घटनास्थळी या प्रकरणी अधिक शोधतपास सुरु करण्यात आला आहे.(Nirbhaya Rape Case दोषींच्या फाशीवरील स्थगितीला तिहार जेल कडून दिल्ली हायकोर्टात आव्हान)

 घटना सकाळी साडेसहा वाजताची आहे. रंजीत बच्चन ते आपल्या मित्रासोबत मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. ग्लोब पार्क येथून निघाले असता बाईकस्वरांनी येत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये बच्चन यांचा मित्र सुद्धा जखमी झाला आहे. त्यांचावर सध्या उपचार ट्रॉमा सेंटर मध्ये सुरु आहेत. बच्चन यांच्या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या वर्षात हिंदूवादी नेते कमलेश तिवारी यांची सुद्धा घरात घुसून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता बच्चन यांच्या हत्येनंतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.