मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे होणार भारतीय लष्कर उपप्रमुख

नरवणे हे लेफ्टनंट जनरल डी. अंबू (Lt Gen D Anbu) यांच्यानंतर या पदाचा कारभार सांभाळतील. अंबू हे 31 ऑगस्ट दिवशी निवृत्त होणार आहेत.

Lt Gen Manoj Mukund Naravane (Photo Credits : commons.wikimedia)

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या नियुक्तींनुसार आता मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे (Manoj Naravane )आता भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख (Army Vice Chief) असतील. नरवणे हे लेफ्टनंट जनरल डी. अंबू (Lt Gen D Anbu) यांच्यानंतर या पदाचा कारभार सांभाळतील. अंबू हे 31 ऑगस्ट दिवशी निवृत्त होणार आहेत. त्यानंतर मनोज नरवणे यांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच ते लष्कर प्रमुख बिपीन रावत ( Bipin Rawat) नंतर ज्येष्ठ अधिकारी असल्याने 31 डिसेंबरला रावत निवृत्त झाल्यानंतर भारताच्या लष्कर प्रमुख पदी देखील मनोज नरवणे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

कोण आहेत मनोज मुकुंद नरवणे?