INDIA Bloc's Mega Rally in Delhi Today: अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर इंडिया आगाडीची आज दिल्लीत 'लोकशाही वाचवा' रॅली; मल्लिकार्जून खडगे, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांची उपस्थिती
आज सकाळी 10 वाजलेपासून या रॅलीला सुरुवात होईल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Arrested) आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना यांना सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केल्यानंतर ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.
राजधानी दिल्ली येथे सत्ताधारी आणि केंद्र सरकारच्या विरोधात विरोधकांच्या वतीने राष्ट्रीय आघाडी असलेल्या इंडिया आघाडी तर्फे "लोकतंत्र बचाओ" (Save Democracy) रॅली (INDIA Bloc Rally) काढण्यात येत आहे. आज सकाळी 10 वाजलेपासून या रॅलीला सुरुवात होईल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Arrested) आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना यांना सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केल्यानंतर ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, या रॅलीसाठी दिल्ली पोलीस आणि प्रशासनाने केवळ 20,000 लोकांनाच येण्याची परवानगी दिली आहे. प्रत्यक्षात मात्र, 30,000 पेक्षाही अधिक नागरिक या रॅलीत दाखल होण्याची शक्यता आहे. शिवाय रामलिला मैदानावर होणाऱ्या सभेसाठी एक लाखांहून अधिक लोक जमा होतील. तसेच, मैदानाच्या क्षमतेपेक्षाही अधिक लोक दाखल होतील, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे.
अरविंद केजरीवाल संयोजक असलेल्या 'आम आदमी पक्षा'तर्फे आयोजित केलेल्या या रॅलीसाठी इंडिया आघाडीचे घटक असलेल्या सर्व राजकीय पक्षाचे नेते किंवा त्यांचे प्रतिनिधी हजर राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी लोकतंत्र बचाओ रॅलीत सहभागी होणार आहेत. या रॅलीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही सहभागी होऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे हेही या मेगा रॅलीला उपस्थित राहणार आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव हे देखील या रॅलीत सहभागी होतील. (हेही वाचा -INDIA Bloc Mega Rally: केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीत 31 मार्च रोजी इंडिया ब्लॉकची मेगा रॅली, आप-काँग्रेसची घोषणा)
दिल्ली येथील 'लोकशाही वाचवा' रॅलीमध्ये प्रमुख राजकीय नेते आणि तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती, झारखंडच्या मुख्यमंत्री चंपाई सोरेन जेएमएमचे, सीपीआय(एम) सरचिटणीस यांसारखे भारतीय राष्ट्रीय विकास समावेशक आघाडी (इंडिया) चे सदस्य सीताराम येचुरी, सीपीआयचे सरचिटणीस डी राजा आणि द्रमुकचे तिरुची सिवा हे देखील या रॅलीत सहभागी होणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, कॅबिनेट मंत्री आणि आपचे आमदारही रॅलीत सहभागी होणार आहेत. (हेही वाचा, Income Tax Department: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, आयकर विभागाकडून 1700 कोटींची डिमांड नोटीस)
व्हिडिओ
सध्या तुरुंगात असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेनही या रॅलीत सहभागी होणार आहेत. सोरेन यांनी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची 6 फ्लॅगस्टाफ रोडवरील दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शनिवारी (31 मार्च) भेट घेतली.