Lok Sabha Polls 2024: भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी खर्च केले 1,737 कोटी रुपये; निवडणूक आयोगाला दिलेल्या अहवालात समोर आली आकडेवारी

भाजप मुख्यालयाने केलेल्या खर्चापैकी 168.92 कोटी रुपये भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर वरिष्ठ नेत्यांसह स्टार प्रचारकांच्या प्रवासावर खर्च झाले. होर्डिंग्ज, कट-आउट्स, स्टिकर्स, हँडबिल, टोप्या, झेंडे आणि साड्यांसह प्रचार साहित्यावर भाजपने 55.75 कोटी रुपये खर्च केले.

Lok Sabha Polls 2024: भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी खर्च केले 1,737 कोटी रुपये; निवडणूक आयोगाला दिलेल्या अहवालात समोर आली आकडेवारी
BJP | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय जनता पक्षाने (BJP) 2024 च्या लोकसभा निवडणुका (Lok Sabha Polls) लढवण्यासाठी 1,737.68 कोटी रुपये खर्च केले, जे गेल्या वर्षीच्या संसदीय आणि चार राज्यांच्या निवडणुकांवर काँग्रेसच्या 584.65 कोटी रुपयांच्या एकत्रित खर्चाच्या जवळपास तिप्पट आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पक्षाच्या खर्चाच्या अहवालानुसार, भाजपचा खर्च 2019 च्या निवडणूक खर्चाच्या 1,264.33 कोटी रुपयांपेक्षा 20224 मध्ये 37 टक्के अधिक आहे. निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या आणि 4 जून 2024 रोजी मतमोजणीसह सात टप्प्यातील निवडणुकांची सांगता झाली. यादरम्यान भाजपने 240 जागा जिंकून एनडीएच्या मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन केले.

निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, लोकसभा निवडणुकीत भाजपने पक्षाच्या प्रचारावर 1,492.39 कोटी रुपये आणि उमेदवारांवर 245.29 कोटी रुपये खर्च केले आहेत. एकूण खर्चापैकी सुमारे 35 टक्के म्हणजे 611.50 कोटी रुपये इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, फोन कॉल्स आणि टेक्स्ट मेसेजवरील जाहिरातींवर खर्च करण्यात आले. अहवालानुसार, जाहिरातींवर खर्च केलेल्या रकमेपैकी जवळपास 30 टक्के रक्कम गुगल इंडिया (रु. 156.95 कोटी) आणि फेसबुक (रु. 24.63 कोटी) यांना गेली.

भाजप मुख्यालयाने केलेल्या खर्चापैकी 168.92 कोटी रुपये भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर वरिष्ठ नेत्यांसह स्टार प्रचारकांच्या प्रवासावर खर्च झाले. होर्डिंग्ज, कट-आउट्स, स्टिकर्स, हँडबिल, टोप्या, झेंडे आणि साड्यांसह प्रचार साहित्यावर भाजपने 55.75 कोटी रुपये खर्च केले. सार्वजनिक सभा आयोजित करण्यासाठी 19.84 कोटी रुपये खर्च केले. पक्षाने दोन सर्वेक्षणांवर 19.58 कोटी रुपये आणि नमो स्टॉलवर 1.79 कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा केली. (हेही वाचा: Nirmala Sitharaman यांनी सादर केला Economic Survey 2025; जीडीपी 6.3% ते 6.8% राहण्याचा अंदाज)

दरम्यान, काँग्रेसने 2024 मधील लोकसभा निवडणुका आणि आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी 584.65 कोटी रुपये खर्च केले. ऑगस्ट 2024 मध्ये सादर केलेल्या अहवालात पक्षाचा 70% खर्च जाहिरातींवर झाल्याचे उघड झाले.

(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2025 07:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).