लोकसभा निवडणूकीचे निकाल लागण्यापूर्वीच मतांमध्ये फेरफार? खासगी वाहने आणि दुकानांमध्ये ईव्हीएम सापडल्याने वाद (Video)
तत्पूर्वी मतांमध्ये फेरफार होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
लोकसभा निवडणूकीचे (Lok Sabha Elections) निकाल लागण्यासाठी अजून दोन दिवसांचा कालावधी बाकी आहे. तत्पूर्वी मतांमध्ये फेरफार होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याचसोबत खासगी वाहने आणि दुकानामध्ये ईव्हीएम मशीन सापडल्याने हा वाद अधिकच वाढला आहे. याबाबत सध्या सोशल मीडियात व्हिडिओ व्हायर होत आहे.
उत्तर प्रदेशमधील चंदौली मधून समोर आलेल्या व्हिडिओत ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन काहीजण गाडीतून बाहेर काढता दिसून येत आहेत. तसेच हे सर्व व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम एका दुकानाच्या आतमध्ये घेऊन जात आहेत.
त्याचसोबत पंजाब येथे एका आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याने अशाच पद्धतीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये सुद्धा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे स्थलांतर करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.(मतदानावेळी हिंसाचार घडलेल्या ठिकाणी पुन्हा फेरमतदान व्हावे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मागणी)
या सर्व प्रकारामुळे आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा केला जात असल्याचे म्हटले आहे. तसेच विरोधकांकडून याबद्दल जोरदार टीका केली जात असून निवडणूक आयोगाने यावर योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे.