Lok Sabha Election 2024 Exit Poll: एक्झिट पोलचे निकाल कितपत अचूक आहेत? जाणून घ्या 2009, 2014 आणि 2019 मध्ये काय घडले

भारतात 1957 सालापासून म्हणजेच दुसऱ्या लोकसभा निवडणुकीपासून एक्झिट पोल सुरू झाले.

Lok Sabha Election 2024 Exit Poll

Lok Sabha Election 2024 Exit Poll: तब्बल 43 दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर देशात सात टप्प्यातील लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections 2024) संपल्या आहेत. अशा परिस्थितीत आता सर्वांच्या नजरा एक्झिट पोलकडे (Exit Polls) लागल्या होत्या आणि आता एक्झिट पोल्सचे निकालही समोर येत आहेत. कोणत्या पक्षाला जनादेश मिळत आहे आणि केंद्रात कोणाची सत्ता येणार आहे, याचा एक अंदाज एक्झिट पोलवरून लावता येतो. भारतात 1957 सालापासून म्हणजेच दुसऱ्या लोकसभा निवडणुकीपासून एक्झिट पोल सुरू झाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनने पहिल्यांदाच हे सर्वेक्षण केले. तेव्हापासून जवळपास प्रत्येक निवडणुकीत एक्झिट पोल घेतले जातात. कधी कधी एक्झिट पोलचे निकाल अगदी अचूक असतात तर कधी प्रत्यक्ष निकालांच्या अगदी विरुद्ध असतात.

आज, 1 जून रोजी 2024 चे एक्झिट पोल समोर आले असता, पूर्वी 2009, 2014 आणि 2019 या सार्वत्रिक निवडणुकांमधील एक्झिट पोल हे मूळ निकालांशी किती मिळतेजुळते होते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. तर त्याआधीच्या दोन निवडणुकांमध्ये युपीएचा विजय झाला होता.

एक्झिट पोल 2009-

2009 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वेक्षण संस्थांचे दावे बहुतांशी फोल ठरले. एक्झिट पोलनुसार, 2009 च्या निवडणुकीत यूपीएला 199 जागा आणि एनडीएला 197 जागेचा अंदाज होता. परंतु निकालात यूपीएला 262 जागा मिळाल्या आणि एनडीएला केवळ 158 जागा मिळाल्या. बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेस पुनरागमन करणार नसल्याचे सांगितले होते, पण निवडणुकीचे निकाल आले आणि काँग्रेसने पुन्हा सरकार स्थापन केले. लोकसभा निवडणुकीच्या 2009 च्या निकालात काँग्रेसला 206 तर भाजपला 116 जागा मिळाल्या होत्या. (हेही वाचा: Lok Sabha Elections 2024 Satta Bazar Prediction: देशात नवे सरकार कोणाचे? NDA की INDIA आघाडी? जाणून घ्या पालनपूर सट्टा बाजाराचा अंदाज)

एक्झिट पोल 2014-

2014 च्या एक्झिट पोलवर नजर टाकली तर आठ एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 283 जागा मिळतील, तर यूपीएला 105 जागा मिळतील असे भाकीत केले होते. मात्र त्यावेळी 'मोदी लाटे'चा अंदाज लावण्यात एक्झिट पोल पूर्णपणे अपयशी ठरले होते. निवडणूक निकालांवर नजर टाकली तर, त्या निवडणुकीत एनडीएला 336 जागा मिळाल्या होत्या व यूपीएला फक्त 60 जागा मिळाल्या होत्या. यामध्ये भाजपला 282 तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या.

एक्झिट पोल 2019-

त्यानंतर 2019 मध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. 2019 मध्ये, 13 एक्झिट पोलने एनडीएला 306 जागा मिळतील, तर यूपीएला 120 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. या निवडणुकीतही एक्झिट पोलने एनडीएच्या कामगिरीला कमी लेखले. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएने 353 जागा जिंकल्या होत्या, तर युपीएने 93 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजपने 303 तर काँग्रेसने 52 जागा जिंकल्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif