Literacy Rate Ranking: महाराष्ट्र 6व्या स्थानी, केरळचं अव्वल स्थान अढळ; आंध्र प्रदेश सर्वात पिछाडीवर
त्यानंतर दिल्लीमध्ये साक्षरता प्रमाण 89% आहे. उत्तराखंड 87% तर आसाममध्ये 85% साक्षरता आहे.
नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसकडून आज (7 सप्टेंबर) शिक्षणा बाबत एक रिपोर्ट जारी करण्यात आला केला. त्यामध्ये पुन्हा केरळ राज्याने आपलं अव्वल स्थान राखलं आहे. केरळ पाठोपाठ दिल्ली राज्याचा नंबर लागतो. या टॉप 5 राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचा नंबर लागला नाही. दरम्यान महाराष्ट्र राज्य सहाव्या स्थानी आहे. केरळ राज्य साक्षरतेमध्ये पहिल्या स्थानी 96.2% सह आहेत. त्यानंतर दिल्लीमध्ये साक्षरता प्रमाण 89% आहे. उत्तराखंड 87% तर आसाममध्ये 85% साक्षरता आहे.
भारतामध्ये सगळ्यात कमी साक्षरतेचे प्रमाण हे दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशमध्ये नोंदवण्यात आली आहे. आंध्रप्रदेशमध्ये बिहारपेक्षाही कमी साक्षरता आहे. दरम्यान सर्वात पिछाडीवर असणार्या आंध्र प्रदेशमध्ये 66.4% आहे.
केरळ मध्ये पुरुष आणि महिला साक्षरतेमधील अंतर हे अत्यंत कमी म्हणजे 2.2% इतके आहे. केरळमध्ये 97.4% पुरुष तर 95.2% महिला साक्षर आहेत. संपूर्ण देशभरातील पुरुष आणि महिला साक्षरतेची आकडेवारी लक्षात घेता हे अंतर सुमारे 14.4% आहे. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. पुरुष 84.7% तर 70.3% महिला साक्षर आहेत.
भारतामध्ये सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेल्या राज्यांमध्ये केरळ, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आसाम चा समावेश होतो. तर उत्तर प्रदेश,तेलंगण, बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश पिछाडीवर असलेल्या राज्यांमध्ये होतो.