ले.ज. मनोज नरवणे नवे लष्करप्रमुख; लवकरच स्वीकारणार कार्यभार, न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्यानंतर महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा

मनोज नरवणे नवे यांनी उपलष्कर प्रमुख म्हणून काही महिन्यांपूर्वी म्हणजे सप्टेंबर महिन्यातच कार्यभार स्वीकारला होता. दरम्यान, विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत हे येत्या 31 डिसेंबर रोजी सेवा निवृत्त होत आहे. त्यामुळे . मनोज नरवणे हे रावत यांच्या जागी नवे लष्करप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.

File image of Lieutenant General Manoj Mukund Naravane | (Photo Credits: Twitter)

ले.ज. मनोज नरवणे (Lieutenant General Manoj Mukund) हे आता भारत सरकारचे लष्करप्रमुख (Indian Army Chief) असणार आहेत. ले.ज. मनोज नरवणे लष्करप्रमुख (Indian Army Chief Mukund Naravane) म्हणून लवखरच आपला कार्यभार स्वीकारतील. 2019 हे वर्ष महाराष्ट्रासाठी विशेष आनंदाचे ठरले कारण, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शरद अरविंद बोबडे (Sharad Arvind Bobde यांची नुकतीच नियुक्ती झाली. बोबडे यांच्या नियुक्तीमुळे प्रदीर्घ काळानंतर मराठमोळी व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर विराजमान झाली. तर, ले.ज. मनोज नरवणे यांच्या रुपाने पुन्हा एकदा मराठमोळ्या व्यक्तीमत्वास देशाच्या महत्त्वपूर्ण यंत्रणेचा प्रमुख म्हणून काम पाहण्याची संधी मिळत आहे.

ले.ज. मनोज नरवणे परिचय थोडक्यात

एएनआय ट्विट

ले.ज. मनोज नरवणे नवे यांनी उपलष्कर प्रमुख म्हणून काही महिन्यांपूर्वी म्हणजे सप्टेंबर महिन्यातच कार्यभार स्वीकारला होता. दरम्यान, विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत हे येत्या 31 डिसेंबर रोजी सेवा निवृत्त होत आहे. त्यामुळे ले.ज. मनोज नरवणे हे रावत यांच्या जागी नवे लष्करप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. (हेही वाचा, नवे सरन्यायाधीश शरद बोबडे या मराठी माणसाच्या आयुष्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?)

एएनआय ट्विट

सप्टेंबर 2019 मध्ये उपलष्कर प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणारे ले.ज. मनोज नरवणे हे लवकरच लष्करप्रमुख होणार हे जवळपास नक्की होते. त्यामुळे सहाजिकच महाराष्ट्राच्या जनतेत एक अभिमानास्पत आनंद व्यक्त होत होता. या आनंदाला लवकरच मूर्त स्वरुप येणार आहे. ले.ज. मनोज नरवणे यांची निवड ही सेवाजेष्ठतेनुसार होत असून, आजघडीला, लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यानंतर सर्वात जेष्ठ अधिकारी म्हणून ले.ज. मनोज नरवणे यांचाच उल्लेख केला जातो.