लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी सलग 90 तास सायकल चालवून पूर्ण केली फ्रान्सची सर्वात जुनी स्पर्धा, 56व्या वर्षी केला विक्रम

पुरी यांनी वयाच्या 56 व्या वर्षी सलग 90 तास सायकलिंग करत 1200 किमी अंतराची फ्रान्स मधील सर्वात जुनी पॅरिस- ब्रेस्ट- पॅरिस सायकलिंग स्पर्धा 23 ऑगस्ट रोजी पूर्ण केली.

Lieutenant General Anil Puri (Photo Credits: Twitter)

भारतीय सैन्याचे (Indian Army)  लेफ्टनंट जनरल (Lieutenant General) अनिल पुरी (Anil Puri)  यांनी सातासमुद्रापार आपल्या नवी एक मोठा विक्रम रचला आहे. पुरी यांनी वयाच्या 56 व्या वर्षी फ्रान्स (France) मधील सर्वात जुनी आणि प्रसिद्ध अशी पॅरिस- ब्रेस्ट- पॅरिस सायकलिंग स्पर्धा 23 ऑगस्ट रोजी पूर्ण केली. विशेष म्हणजे यामध्ये त्यांनी विनाआराम सलग 90 तास सायकलिंग करत 1200 किमी अंतराची ही स्पर्धा पूर्ण केली आहे. तसेच निवृत्तीपूर्व काळात सेवेत रुजू असताना अशा प्रकारचा विक्रम करणारे भारतीय सैन्यातील ते पहिले अधिकारी ठरले आहेत. यानंतर अनेक ठिकाणहून अनिल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काँग्रेसचे नेते व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी देखील एक खास ट्विट करून अनिल यांचे अभिनंदन केले.

अशोक गेहलोत ट्विट

(पीव्ही सिंधू हिची BWF World Championships 2019 च्या फायनल फेरीत धडक, सुवर्ण इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर)

दरम्यान, या स्पर्धेची सुरुवात 1931 मध्ये फ्रान्समध्ये झाली होती. दर चार वर्षातून एकदा पार पडणाऱ्या या स्पर्धेत हजारोंच्या संख्येत उत्साही सायकलस्वार सहभाग घेतात. यंदा यातील 31,125 जणांना ही स्पर्धा पूर्ण करता आली. अनिल पुरी यांच्या सह मैसूर मधील महेश चौधरी या तरुणाने देखील ही स्पर्धा पूर्ण केली आहे. भारतातून यंदा 180 हुन अधिक जणांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.