Lesbian Partner Detained By Parents Case: लेस्बियन पार्टनरला कुटुंबीयांनी जबरदस्तीने केले विलग, तरुणीची हायकोर्टात याचिका
केरळ हायकोर्टात एक रिट याचिका दाखल झाली आहे. ही याचिका लेस्बियन (Lesbian) असलेल्या 21 वर्षीय सुमय्या शेरीन (Sumayya Sherin) हिने दाखल केली आहे. केरळ हायकोर्टात (Kerala High Court) दाखल केलेल्या याचिकेत सुमय्या शेरीन हिने दावा केला आहे की, तिला तिच्या लेस्बियन पार्टनरपासून (Lesbian Partner) तिच्या जोडीदाराच्या कुटुंबीयांनी वेगळे केले आहे.
केरळ हायकोर्टात एक रिट याचिका दाखल झाली आहे. ही याचिका लेस्बियन (Lesbian) असलेल्या 21 वर्षीय सुमय्या शेरीन (Sumayya Sherin) हिने दाखल केली आहे. केरळ हायकोर्टात (Kerala High Court) दाखल केलेल्या याचिकेत सुमय्या शेरीन हिने दावा केला आहे की, तिला तिच्या लेस्बियन पार्टनरपासून (Lesbian Partner) तिच्या जोडीदाराच्या कुटुंबीयांनी वेगळे केले आहे. याचिकेत महिलेला तिच्या जोडीदारासोबत पुनर्मिलन करण्याची विनंती करण्यात आली होती. दोन्ही तरुणी सनातनी मुस्लिम कुटुंबातील आहेत. त्यांच्या कुटुंबांनी त्यांना वेगळे करण्याचे सर्व मार्ग प्रयत्न केले आहेत. दरम्यान, याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने जोडीदाराच्या पालकांना नोटीस बजावली.
सुमय्या शेरीन ही केरळ येथील मलप्पुरम (Malappuram ) जिल्ह्यातील कोंडोटी (Kondoty) येथील मूळ रहिवासी आहे. तिने म्हटले आहे की, 30 मे 2023 रोजी आफीफा हिचे एका कॅफेमधून अपहरण केले. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हे लेस्बियन युगुल (जोडपं) घरातून पळून गेले होते. त्यानंतर जोडप्याच्या नातेवाइकांनी पोलिसात गुन्हा दाखल केल्याचे याचिकेत म्हटले आहे. न्यायिक दंडाधिकार्यांनी जोडप्याला एकत्र राहण्याची परवानगी दिली, परंतु जेव्हा ते एर्नाकुलम येथे स्थलांतरित झाले तेव्हा याचिकाकर्त्याच्या जोडीदाराला तिच्या स्वतःच्या पालकांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले. पोलिसांनी याबाबत कोणतीही दखल घेतली नाही, असाही आरोप सुमय्या शेरीन नामक तरुणीने याचिकेत केला आहे. (हेही वाचा, Kolkata Lesbian Couple: कोलकाता येथील लेस्बियन जोडपे अडकले लग्नबंधनात; दोन तरुणींनी घेतल्या आयुष्यभरासाठी आणाभाका)
ट्विट
याचिकाकर्त्या तरुणीने असेही म्हटले की पालक तिला जबरदस्तीने धर्मांतर चिकित्सा करून देऊ शकतात आणि तिला देश सोडून जाण्यास भाग पाडू शकतात. राजकीय दबावामुळे पोलिस तक्रारींवर कारवाई करत नसल्याचे देखील तिने तक्रारीत नमूद केले आहे. याचिकाकर्त्याने याचिका दाखल करताना सुप्रिम कोर्टाने याचिकाकर्त्याने Navtej Singh Johar & Ors. v Union of India या खटल्या दिलेल्या निकालाचाही दाखला दिला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)