IPL Auction 2025 Live

Land-for-jobs case: लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि मीसा भारतीला जामीन मंजूर

यावेळी लालू प्रसाद यादव हे व्हिलचेअरवरुन कोर्टात दाखल झाले होते.

Lalu prasad yadav and Rabri devi

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav), बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabari Devi), आणि त्यांची कन्या मीसा भारती (Misa Bharati) यांना दिल्ली कोर्टाकडून आज रेल्वेत जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक न करता आरोपपत्र दाखल केल्याचे न्यायालयाने नमूद केले. प्रत्येक आरोपीला 50,000 रुपयांचे वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढीच रक्कम जामीन म्हणून देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

लालू प्रसाद यादव त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलगी मीसा भारती यांनी आज सकाळी दिल्लीच्या अवेन्यू कोर्टात हजेरी लावली. यावेळी लालू प्रसाद यादव हे व्हिलचेअरवरुन कोर्टात दाखल झाले होते. बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचे डॉक्टर लवकरच निर्णय घेतील की ते कोर्टरूममध्ये शारीरिकरित्या उपस्थित राहतील की नाही. डॉक्टरांनी सल्ला दिल्यास, यादव यांचे वकील सूट मागतील आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्यासाठी अर्ज दाखल करतील अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या या कथीत घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने गेल्या आठवड्यात राबडी देवी यांचा जवाब नोंदवला होता. यानंतर पाच अधिकाऱ्यांच्या टीमने मीसा भारती यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची देखील चौकशी केली होती.दरम्यान ७४ वर्षीय लालू प्रसाद यादव हे किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर सिंगापूरहून नुकतेच परतले आहेत.