IND vs AUS 4th Test 2024: केएल राहुलकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, मेलबर्न कसोटीत करणार 'ही' कामगिरी

या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

KL Rahul (Photo Cedit - X)

India National Cricket Team vs Australia Men's National Cricket Team: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. जिथे टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत. त्याचबरोबर ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. या मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. अशा स्थितीत टीम इंडियाच्या नजरा चौथ्या कसोटी सामन्यात पुनरागमनाकडे असतील. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलला (KL Rahul)एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

राहुल करू शकतो 'हा' विक्रम 

केएल राहुलने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत दोन शतके झळकावली आहेत. राहुलने चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकल्यास बॉक्सिंग डे कसोटीत त्याच्या नावावर एकूण तीन शतके होतील. यासह तो टीम इंडियासाठी बॉक्सिंग डे कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनेल. त्यांच्याशिवाय अजिंक्य रहाणे आणि सचिन तेंडुलकर यांनीही बॉक्सिंग डे कसोटीत दोन शतके झळकावली आहेत.

बॉक्सिंग डे कसोटीत सर्वाधिक शतके झळकवणारे टीम इंडियाचे फलंदाज

2 सचिन तेंडुलकर

2 अजिंक्य रहाणे

2 केएल राहुल

1 डी वेंगसरकर

1 कपिल देव

1 मोहम्मद अझरुद्दीन

1 वीरेंद्र सेहवाग

1 विराट कोहली

1 चेतेश्वर पुजारा

राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये

स्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या मालिकेत केएल राहुलची आतापर्यंतची कामगिरी अतिशय उत्कृष्ट आहे. या कसोटी मालिकेत तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने तीन सामन्यांच्या 6 डावात 47 च्या सरासरीने 235 धावा केल्या आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्यातही त्याने 84 धावांची खेळी केली होती. या मालिकेत त्याने आतापर्यंत दोन अर्धशतके झळकावली आहेत. अशा स्थितीत त्याची नजर या मालिकेत शतक ठोकण्यावरही असेल.