IPL Auction 2025 Live

Khushbu Sundar On Sexual Abuse: वयाच्या आठव्या वर्षी वडिलांनी लैंगिक शोषण केले- खुशबू सुंदर

खुशबू सुंदरने म्हटले आहे की, मी आठ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी माझे लैंगिक शोषण केले. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी खुशबू 'कलियुग पांडवुलु' (Kaliyuga Pandavulu) या चित्रपटात हिरोईन बनली होती.

Khushbu Sundar (Photo Credits: ANI)

भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या (National Commission for Women) सदस्या खुशबू सुंदर (Kushboo Sundar) यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. खुशबू सुंदरने म्हटले आहे की, मी आठ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी माझे लैंगिक शोषण केले. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी खुशबू 'कलियुग पांडवुलु' (Kaliyuga Pandavulu) या चित्रपटात हिरोईन बनली होती. कलियुग पांडवुलु (Kaliyuga Pandavulu) चित्रपटानंतर, खुशबू सुंदर ही साउथ फिल्म इंडस्ट्रीची स्टार म्हणून उदयास आली. चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी सहाय्यक अभिनेता म्हणून दुसरी इनिंग सुरू केली. उत्तरार्धातही त्या चांगल्या भूमिका करत आहेत. दरम्यान, खुशबूने नुकतीच महिलांच्या लैंगिक छळावर प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या बालपणातील लैंगिक शोषणाबाबत तिने खळबळजनक खुलासा केला आहे.

खुशबू सुंदरने सांगितले की, मी 8 वर्षांची असताना माझ्या वडिलांनी माझे लैंगिक शोषण केले. वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत माझ्या वडिलांविरुद्ध बोलण्याची हिंमत माझ्यात नव्हती. माझी आई माझ्या वडिलांना 'देव' मानत होती. त्यांनी सांगितले की, त्यांना सुरुवातीला आईला हे सांगायचे होते. पण त्यांना भीती वाटत होती की आई त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. लैंगिक छळावर खुशबू सुंदर यांचा वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. (हेही वाचा, National Commission for Women कडून गरोदर महिलांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत देण्यासाठी WhatsApp helpline नंबर जारी)

मुंबईतील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या खुशबूला अभिनयाची आवड होती. खुशबू तमिळ दिग्दर्शक आणि अभिनेता सी. सुंदर यांच्याशी केली आहे. डीएमके मध्ये प्रवेश करत 2010 मध्ये त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु केली. पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पक्षाच्या प्रवक्त्या बनल्या. यानंतर, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2021 ची तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवली. परंतु द्रमुकच्या एन अझिलनकडून त्यांचा पराभव झाला. खुशबू सुंदर यांनी नुकताच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्याचा पदभार स्वीकारला आहे.