Kerala Teen Dies by Suicide: प्रेम एकावर विवाह दुसऱ्यासोबत, लग्नाच्या आदल्या रात्री नवरीची आत्महत्या; तिचा मृत्यू, तो मात्र वाचला; वाचा सविस्तर

केरळ राज्यातील मलप्पुरम जिल्ह्यात एका 18 वर्षीय महिलेने तिच्या लग्नाच्या एक दिवस आधी आत्महत्या केली. ती दुस-या पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये होती पण कुटुंबीयांनी तिच्या इच्छेविरुद्ध लग्न ठरवले होते. तिच्या प्रियकरानेही आत्महत्येचा प्रयत्न केला.

Indian Marriage | (Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com)

Kerala Crime News: केरळ राज्यातील एका तरुणीने विवाहाच्या आदल्या दिवशी आत्महत्या (Malappuram Suicide) करुन आपले आयुष्य संपवले आहे. मलप्पुरम जिल्ह्यात ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, शौमा सिनिवार असे मृत तरुणीचे नाव असून ती केवळ 18 वर्षांची आहे. परिसरातीलच शेजारी राहणाऱ्या साजीर नामक तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंंबंधास कुटुंबीयांचा विरोध होता. कुटुंबीयांनी तिचा विवाह दुसऱ्या व्यक्तीशी जबरदस्तीने ठरवला (Forced Marriage) त्यातून तिने हे टोकाचे पाऊल उलचलल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक असे की, या तरुणीसोबत प्रेमसंबंध असलेल्या साजीर नावाच्या तरुणानेही हाताच्या मनगटाची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच त्याच्यावर वैद्यकीय उपचार झाल्याने त्याचे प्राण वाचविण्यास यश आले आहे.

पीडितेवर मानसिक दबाव

शौमा सिनीवार हिने आपले साजीर नामक तरुणावर प्रेम असल्याची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली होती. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचेही तिने कुटुंबीयांना सांगितले होते. मात्र, कुटुंबीयांचा या दोघांच्या प्रेमसंबंधांना तीव्र विरोध होता, त्यामुळे दोघांचे नाते स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. त्यातूनच कुटुंबीयांनी शौमा हिचा विवाह भलत्याच व्यक्तीशी ठरवला. विरोध असतानाही कुटुंबीयांच्या दबावामुळे विवाह करावा लागणार असल्याने शौमा प्रचंड मानसिक (Mental Health) दबावात होती. (हेही वाचा, Wedding Fraud: नववधूला लघुशंका, संसारावर पाणी; लग्नमंडपात विधी सुरु असताना नवरी पळाली भूर्रर्र, नवरा लटकला, वाचा सविस्तर)

कुटुंबीयांकडून जबरदस्तीने विवाह

दरम्यान, शौमा हिचा नकार असतानाही कुटुंबीय विवाहावर ठाम होते. आता आपली या विवाहातून सुटका नाही, हे जवळपास शौमा हिच्या लक्षात आले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी जबरदस्तीने लादलेल्या निर्णयास कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले. प्राप्त माहितीनुसार, घरामध्ये विवाहाची धुमधाम सुरु होती. जवळपास सर्वच तयारी झाली होती. असे असताना लग्नास केवळ एकच दिवस बाकी असताना शौमा ही आपल्या काकाच्या घराच्या टेरेसवर गेली आणि तिथे तिने गळफास घेतला. शौमा हिच्या वडिलांचे आगोदरच निधन झाले आहे. तेव्हापासून ती आपल्या काकांसोबतच राहात होती. (हेही वाचा, Extra-Marital Dating App Gleeden: विवाहबाह्य डेटिंग अ‍ॅप 'ग्लीडेन'वर तब्बल 30 लाख भारतीय सक्रिय; सर्वाधिक वापरकर्त्यांसह बेंगळुरू आघाडीवर)

प्रियकरास जबर मानसिक धक्का

दुसऱ्या बाजूला, शौमा हिच्या निधनाचे वृत्त समजताच तिचा कथीत प्रियकर साजिर यानेही आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने हाताची नस कापल्याचे कुटुंबीयांच्या ध्यानत आल्याने त्यास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून, त्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याचे समजते. मात्र, डॉक्टरांनी काही काळ त्यास विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

वाचकांसाठी सल्ला: जर तुम्ही स्वत: किंवा तुमच्या परिचयातील कोणीही व्यक्ती मानसिक ताण, मानसिक आरोग्यविषयक समस्या किंवा इतर कोणत्या अन्याय, अत्याचाराच्या घटनांमुळे आत्महत्येच्या विचारांनी ग्रस्त असाल, तर कृपया व्यावसायिक मदत घ्या किंवा मानसिक आरोग्य हेल्पलाइनशी संपर्क साधा. विनामुल्य सेवा आणि माहितीसाठी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. हे सर्व क्रमांक टोल फ्री आहेत. त्यावरुन मागितलेल्या मदत, मार्गदर्शनासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

महिला, बालक आणि नागरिकांना तत्काळ मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक:

चाइल्डलाइन इंडिया – 1098; हरवलेली मुले आणि महिला – 1094; महिला हेल्पलाइन - 181; महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग – 112; राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन – 7827170170; पोलीस महिला आणि ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन - 1091/1291.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now