कर्नाटक: मुलांना शिकता यावे यासाठी पैसे नसल्याने महिलेने मंगळसुत्र गहाण ठेवत खरेदी केला टीव्ही

कर्नाटक येथील एका महिलेने मुलांना शिकवण्यासाठी पैसे नसल्याने तिचे मंगळसुत्र गहाण ठेवत टीव्ही खरेदी केला आहे.

Karnataka Women (Photo Credits-ANI)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु सध्या सराकारने देशाला आर्थिक चालना मिळावी म्हणून काही उद्योगधंदे सुरु केले आहेत. परंतु शाळा, महाविद्यालये किंवा कोचिंग क्लासेस अद्याप बंद ठेवण्यात आले आहे. मुलांना सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. परंतु ग्रामीण भागात इंटरनेटसह काहींना शिक्षणासाठी समस्या उद्भवत आहेत. याच दरम्यान कर्नाटक येथील एका महिलेने मुलांना शिकवण्यासाठी पैसे नसल्याने तिचे मंगळसुत्र गहाण ठेवत टीव्ही खरेदी केला आहे.(Gautam Gambhir to Help Daughters of Sex Workers: सेक्स वर्कर्सच्या मुलींना मिळणार 'पंख'; गौतम गंभीरने घेतली 25 मुलींची जबाबदारी, तर सुरेश रैनाच्या पत्नीने सामील होण्याची व्यक्त केली इच्छा)

कस्तुरी असे महिलेचे नाव असून तिने म्हटले आहे की, शिक्षकांनी टीव्ही खरेदी करण्यास सांगितले. परंतु आमच्याकडे खरेदी करण्यासाठी पैसे नाही. तसेच मुलांना शिकण्यासाठी नेहमीच बाजूच्यांकडे पाठवणे शक्य नाही असे ही तिने सांगितले आहे. (New National Education Policy 2020: केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाचे सूत्र 5+3+3+4)

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षाबाबत अद्याप संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच युसीजीकडून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात असे म्हटले आहे. परंतु परीक्षा घेण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. कोरोनाच्या काळात परीक्षा घेणे चुकीचे असून विद्यार्थ्यांना सरासरी गुणांनुसार पास करावे अशी ही मागणी करण्यात आली आहे.