Karnataka Shocker: पतीने चॉकलेट आणले नाही म्हणून संतापलेल्या पत्नीने केली आत्महत्या, जाणून घ्या सविस्तर

त्यावर गौतमने तिला लवकर घरी येऊन मुलांची चांगली काळजी घेण्यास सांगितले. परंतु त्याला नंदिनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. घाबरलेल्या गौतमने तिला कॉल केला परंतु त्याचे कॉल अनुत्तरित असल्याचे आढळले.

Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

लोकांना आयुष्याची कवडीमोलही किंमत नाही याचा प्रत्यय येणारी अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. दररोज अगदी क्षुल्लक कारणामुळे आत्महत्या (Suicide) करणाऱ्यांच्या अनेक बातम्या आपण पाहत असतो. आता कर्नाटकात पतीने चॉकलेट आणले नाही म्हणून रागाच्या भरात एका 30 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. गुरुवारी दुपारी हेन्नूर बांदेजवळील (Hennur Bande) होनप्पा ले-आऊटमध्ये या महिलेने गळफास लावून घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदिनी आणि गौतम हे दाम्पत्य कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते. गौतम हा सहकारनगर येथील एका सलूनमध्ये काम करत होता. या दोघांना दोन मुले आहेत. एके दिवशी आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना गौतम आणि नंदिनी यांच्यामध्ये वाद झाला. त्यांनतर दोघेही शांत झाल्यावर नंदिनीने गौतमला चॉकलेट विकत घेण्यास सांगितले. चॉकलेट घेऊन परत येईन असे सांगून तो निघून गेला, परंतु त्यांनतर त्याने नंदिनीच्या कॉलला उत्तर दिले नाही.

रात्री 11.45 च्या सुमारास नंदिनीने गौतम व्हॉट्सअॅप मेसेज केला की, ती जात आहे. त्यावर गौतमने तिला लवकर घरी येऊन मुलांची चांगली काळजी घेण्यास सांगितले. परंतु त्याला नंदिनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. घाबरलेल्या गौतमने तिला कॉल केला परंतु त्याचे कॉल अनुत्तरित असल्याचे आढळले. त्यानंतर गौतमने ताबडतोब घरी धाव घेतली. मात्र जेव्हा गौतम घरी पोहोचला तेव्हा त्याला नंदिनी फासाला लटकलेली दिसली. (,हेही वाचा: Karnataka: आजीला सलाम! हृदय शस्त्रक्रियेनंतरही ती रुळावर धावत राहिली, अपघातापूर्वी लाल कपडा दाखवून थांबवली ट्रेन)

याप्रकरणी हेन्नूर पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मात्र नंदिनीच्या कुटुंबीयांनी गौतमवर कोणतेही आरोप केलेले नाहीत. दुसरीकडे, यूपीच्या ललितपूरमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. कुटुंबीयांनी पैसे नसल्याने या मुलीला मोबाईल घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर तिने विष प्राशन करून आत्महत्या केली.