काँग्रेसे नेते DK Shivakumar यांनी उधळल्या 500 रुपयांच्या नोटा? (Watch Video)
या व्हिडओवरुन दावा करण्यात येतो आहे की, डीके शिवकुमार यांनी एका रॅलीदरम्यान नागरिकांना 500 रुपयांच्या नोटा वाटल्या किंवा या नोटा उधळल्या.
DK Shivakumar Video: काँग्रेस ( Karnataka Congress) नेते डी के शिवकुमार (DK Shivakumar) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडओवरुन दावा करण्यात येतो आहे की, डीके शिवकुमार यांनी एका रॅलीदरम्यान नागरिकांना 500 रुपयांच्या नोटा वाटल्या किंवा या नोटा उधळल्या. वृत्तसंस्था एएनआयनेही हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. कर्नाटकराज्यात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. निवडणूक आयोगाकडून आज त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, श्रीरंगपटना येथे काँग्रेसने 'प्रजा ध्वनी यात्रा' आयोजित केली होती. या यात्रेदरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार हे मांड्या जिल्ह्यातील बेविनाहळ्ळी येथे उपस्थित होते. या वेळी ते कलाकारांवर 500 रुपयांच्या नोटा उधळताना दिसले. (हेही वाचा, Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक आज जाहीर होण्याची शक्यता; निवडणूक आयोगाची 11.30 वाजता पत्रकार परिषद)
केंद्रीय निवडणूक आयोग कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा आज करण्याची शक्यता आहे. असे असले तरी काँग्रेसने मात्र आपल्या 124 उमेदवारांची पहिली यादी आगोदरच जाहीर केली आहे. हे उमेदवार निवडणुकीच्या प्रचारालाही लागले आहेत. स्वत: डीके शिवकुमार हे त्यांच्या कनकापुरा (Kanakapura assembly constituency) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. (हेही वाचा, Karnataka Assembly Elections 2023: काँग्रेस पक्षाकडून कर्नाटक विधानसभेसाठी 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर)
ट्विट
डीके शिवकुमार अल्पपरिचय
डीके शिवकुमार यांचे पूर्ण नाव दोड्डालहल्ली केम्पेगौडा शिवकुमार असे आहे. ते राजकारणी असून काँग्रेस पक्षाचे कर्नाटक राज्यातील ते एक प्रमुख आणि ताकदवान नेते म्हणून ओळखले जातात. सध्या ते कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एचडी कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात ते सिंचन राज्यमंत्री होते. त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबाबत सांगायचे तर मायनेता डॉटकॉमने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे शिक्षण पुढीलप्रमाणे राज्यशास्त्रात M.A. 2006 कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ म्हैसूर पदव्युत्तर पदवी, पदवी SIRC बंगलोर पदवी अपूर्ण 1984, PUC HKES कॉलेज बंगलोर प्री-युनिव्हर्सिटी कोर्स 1980, शाळा विद्या वर्धका हायस्कूल माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला.