Kargil Vijay Diwas 2020: गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून शूरवीरांना नमन करत सर्व जनेतला दिल्या कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा
या ऐतिहासिक दिवसाच्या गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी ट्विटच्या माध्यमातून शूरवीरांना नमन करत सर्वांना कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
21st Anniversary Kargil Vijay Diwas 2020: प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून येईल असा ऐतिहासिक दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. 26 जुलै हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने गौरवाचा आणि महत्वाचा दिवस आहे, याच दिवशी 1999 साली भारतीय सैन्याने पाकिस्तानला अक्षरशः गुडघे टेकायला लावलं होतं. या युद्धात अनेक भारतीय जवानांना वीरमरण देखील आले. तब्बल 74 दिवस सुरु असलेल्या या युद्धात 26 जुलै 1999 या दिवशी अखेर भारतीय सैन्याने विजय मिळवला. म्हणूनच हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या ऐतिहासिक दिवसाच्या गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी ट्विटच्या माध्यमातून शूरवीरांना नमन करत सर्वांना कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटे आहे की"कारगिल विजय दिवस हा भारताच्या स्वाभिमान, अद्भूत पराक्रम आणि दृढ नेतृत्व याचे प्रतीक आहे. मी त्या शूरवीरांना नमन करतो, ज्यांनी आपल्या पराक्रमाने, साहसाने शत्रूशी लढून उंच दुर्गम पर्वतावर आपला तिरंगा फडकवला. या मातृभूमीच्या शूरवीरांना कोटी कोटी प्रणाम." Kargil Vijay Diwas 2020: कारगिल विजय दिवसाच्या 21व्या वर्षपुर्ती निमित्त जाणून घ्या ऑपरेशन विजय विषयी 'या' खास गोष्टी
तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 21 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त मी "माझ्या शूर योद्धांना नमन करतो ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. कारगिल युद्धात उद्भवलेल्या खडतर परिस्थितीत जोखीम पत्करून विजय मिळवला" असे म्हटले आहे.
तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले होते. आज या घटनेला 21 वर्ष पूर्ण होत आहेत.