Kanpur Shocking: कानपूर हादरले! सात वर्षाच्या मुलाकडून 3 वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
सात वर्षांच्या मुलाने तीन वर्षांच्या मलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कानपूर शहराच्या चकेरी (Chakeri Area of Kanpur) परिसरात घडली. धक्कादायक असे की, अल्पवयीन आरोपीने पीडितेवर कट रचून बलात्कार करण्याचा प्रयत्न (7-Year-Old Boy Attempted Rape to 3-year-Old Girl) केला.
एका धक्कादायक घटनेने कानपूर शहर हादरुन गेले आहे. इतकेच नव्हे तर संपूर्ण देशातही आश्चर्य आणि काळजी व्यक्त केली जात आहे. वृत्त आहे की, एका सात वर्षांच्या मुलाने तीन वर्षांच्या मलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कानपूर शहराच्या चकेरी (Chakeri Area of Kanpur) परिसरात घडली. धक्कादायक असे की, अल्पवयीन आरोपीने पीडितेवर कट रचून बलात्कार करण्याचा प्रयत्न (7-Year-Old Boy Attempted Rape to 3-year-Old Girl) केला. आरोपीने पीडितेला सायकलवर बसविण्याचे (Bicycle Ride) आमिष दाखवले आणि तिला जवळच्या नाल्याजवळ नेले. तेथे नेऊन तिच्यावर त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
सोबतच्या मुलाकडून आपल्यासोबत काहीतरी विचित्र प्रकार घडतो आहे हे लक्षात येताच पीडिता घाबरुन गेली. तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. पीडितेचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धाऊन आले. नागरिकांना पाहताच मुलगा मुलीला तिथेच सोडून पळून गेला. दरम्यान, नागरिकांनी मुलीला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती दिली. सध्या जखमी अवस्थेत रूग्णालयात नेण्यात आले आणि गृहनिर्माण नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. अल्पवयीन मुलाने तिला ब्लेडने जखमी केल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 'इंडिया टुडे'ने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Love, Sex Aur Dhokha: प्रेमात धोका, नवरदेवाला पोलिसांनी मांडवातून उचलले, लग्नही मोडले; तरुणीच्या तक्रारीनंतर थेट कारवाई)
चकेरीचे एसपी अमर नाथ यादव इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले की, डबल कॉलनी येथील एका सात वर्षीय मुलाने परिसरातीलच तीन वर्षांच्या मुलीला नाल्याजवळ नेले आणि तिच्यासोबत अमानूष वर्तन करण्याचा प्रयत्न केला. मुलीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पीडिता आणि आरोपी अल्पवयीन असल्याने सर्व बाजू विचारात घेऊन कायदेशीर कारवाई सुरु आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)