Kanpur Shocker: शिक्षक पतीची निर्घृण हत्या, आरोपी पत्नी आणि तिचा साथीदार ताब्यात, कानपूर येथील घटना
या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे
Kanpur Shocker: उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका महिलेने प्रियकरच्या मदतीने आपल्या पतीची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना कानपूरमधील पंकी परिसरातील आहे. महिलेने सरकारी शाळेत असलेला शिक्षक पतीचीची एका खोली जिंवत जाळून हत्या केली आहे. दयाराम असं मृत शिक्षकाचे नाव आहे. त्याचा धाकटा भाऊ अनूज याने पोलिसांना या घटनेची खबर दिली. पोलिस या घटनेची चौकशी करत आहे. (हेही वाचा- अनैसर्गिक संबंधांमुळे संतापलेल्या पत्नीने घेतला पतीच्या प्रायव्हेट पार्टचा चावा)
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा प्रियकर आणि त्याच्या साथीदारांनी पत्रासा गावातील एका खोलीत शिक्षक दयाराम याला पत्रासा गावातील एका खोलीत बंद करून त्याला जिंवत जाळले. दयाराम हे सरकारी शिक्षक म्हणून कार्यरत होते. महिलेच्या साथीदारांनी फोन करून दयाराम यांना एका खोलीत बोलावले होते त्यानंतर त्यांना खोलीत बंद केले आणि खोलीला आग लावली.
घटनेचा थरारक व्हिडिओ
या घटनेची माहिती दयाराम याचा भाऊ अनुजला मिळाली. अनुजने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतला परंतु दार उघडेपर्यत दयाराम जळून खाक झाले होते. पोलिसांनी या घटनेअंतर्गत पत्नी आणि तिच्या साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतेल आहे. पोलिस उपायुक्त (पश्चिम) विजय धुळ यांनी घटनास्थळाची पाहणी केली.अजूनने दयाराम यांच्या पत्नी आणि तिच्या साथीदारांविरुध्दात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणी तपासणी करत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.