Kanchenjunga Express Accident: कंचनजंगा एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात सिलीगुडी येथे धडक, रेल्वे अपघातात अनेक जखमी
ही घटना पश्चिम बंगाल राज्यातील सिलीगुडी (Siliguri Train Accident) येथे घडली. या घटनेमध्ये कांचनगंगा एक्सप्रेसचे काही डबे रुळावरुन घसरल्याचे समजते.
आगरतळा-सियालदाह कंचनजंगा एक्स्प्रेस (13174) (Kanchenjunga Express Accident) आणि मालगाडी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना पश्चिम बंगाल राज्यातील सिलीगुडी (Siliguri Train Accident) येथे घडली. या घटनेमध्ये कांचनगंगा एक्सप्रेसचे काही डबे रुळावरुन घसरल्याचे समजते. दरम्यान, रेल्वे अपघात घडल्याचे समजताच पोलीस आणि प्रशासन तातडीने घटानास्थळी दाखल झाले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु झाले असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही घटनेची नोंद घेतली आहे. दरम्यान, अपघात घडले ते ठिकाण दुर्गम भागात असल्याने आणि त्यातच पाऊसही सुरु असल्याने मदत कार्यात अडथळा येत असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेचा अधिक तपशिलाची प्रतिक्षा आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेची दखल घेत, सोशल मीडिया मंच एक्स (जुने ट्विटर) तत्काळ प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेबद्दल शोक आणि चिंता व्यक्त करत X वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसीडेवा भागात झालेल्या एका भीषण रेल्वे अपघात घडल्याची आत्ताच माहिती मिळाली. ही घटना ऐकूण धक्का बसला. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. मात्र, कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीने धडक दिल्याचे प्राथमिक वृत्त आहे. डीएम, एसपी, बचाव, पुनर्प्राप्ती आणि वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती पथके युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत." (हेही वाचा, World's Highest Chenab Railway Bridge: जगातल्या सर्वात उंच पुलावर ट्रेनची ट्रायल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला व्हिडिओ)
पश्चिम बंगाल मुख्यमंत्र्यांची एक्स पोस्ट
तात्काळ बचाव कार्य
अपघातानंतर जखमी प्रवाशांच्या मदतीसाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना तातडीने वैद्यकीय सेवेसाठी जवळच्या रुग्णालयात नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत, जलद आणि प्रभावी मदत सुनिश्चित करण्यासाठी बचाव आणि मदत कार्य यांवर बारीक नजर ठेऊन आहेत.
व्हिडिओ
अधिकाऱ्यांकडून माहितीस प्राधान्य
उत्तर बंगालमधील न्यू जलपाईगुडीजवळ झालेल्या या टक्करमुळे अपघाताची परिस्थिती काय आहे याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, घटनेचे कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी आणि भविष्यातील घटना टाळण्यासाठी अधिकारी आवश्यक माहिती घेत आहेत.
एक्स पोस्ट
मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा
सिलीगुडीमध्ये मुसळधार पावसाच्या दरम्यान ही घटना घडली. त्यामुळे बचावकार्य आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. या अपघातामुळे कोलकाता आणि सिलीगुडी दरम्यानचा मुख्य रेल्वे मार्ग विस्कळीत झाले. परिणामी लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत.
अपघाताचा तपशील
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कांचनजंगा एक्सप्रेस सोमवारी सकाळी वेळापत्रकानुसार न्यू जलपाईगुडी स्थानकावरून निघाली. नीचबारी आणि रंगपाणी स्थानकांदरम्यान मालवाहू गाडीने एक्सप्रेसला पाठीमागून धडक दिल्याने ही टक्कर झाली, ज्यामुळे मागील दोन डब्बे रुळावरून घसरले आणि उलटले.
घटनास्थळावरील माहिती
घटनास्थळावरील काही दृश्ये आणि छायाचित्रे सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आली आहेत आणि व्हायरलही झाली आहेत. ज्यामध्ये पाहायला मिळते की, ज्यामध्ये एक डब्बा चिरडला गेला आणि दुसरा रुळावरून उलटला गेला. स्थानिक रहिवासी बचाव कार्यात सामील झाले आहेत. सतत पाऊस असूनही, अनेकजण मदत करत असताना स्वत:चे संरक्षण करण्यासाठी छत्री वापरत आहेत.
अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट
अपघाताचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. त्यासाठी आवश्यक माहिती रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घेत आहेत. टक्कर होण्यापूर्वी कांचनजंगा एक्स्प्रेस स्थिर होती का, सिग्नल बिघडले होते का आणि दार्जिलिंगमधील प्रतिकूल हवामानाची भूमिका होती का याचाही अधिकारी शोध घेत आहेत.
घटनेची पुनरावृत्ती
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये यापूर्वी सन 2022 मध्ये अशीच घटना घडली होती. हा अपघात 2022 मध्ये जलपाईगुडीमधील मैनागुरीजवळ बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसच्या रुळावरून घसरली होती. ज्यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला होता.