COVID-19 Research साठी देहदान करणाऱ्या 93 वर्षीय Jyotsna Bose ठरल्या पहिल्या भारतीय महिला

असं करणाऱ्या या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. या मेडिकल रिसर्चमध्ये कोरोना व्हायरसचा शरीरारवर नेमका काय परिणाम होतो याचा अभ्यास होणार आहे.

Covid-19 (Photo Credit: ANI)

कोलकाता (Kolkata) येथील 93 वर्षीय ज्योत्स्ना बोस (Jyotsna Bose) यांनी कोविड-19 मेडिकल रिसर्च (Covid-19 Medical Research) साठी देहदान केले आहे. असं करणाऱ्या या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. या मेडिकल रिसर्चमध्ये कोरोना व्हायरसचा शरीरारवर नेमका काय परिणाम होतो याचा अभ्यास होणार आहे. गंधर्पण  एनजीओने दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 रिसर्चसाठी देहदान करणाऱ्या बोस या पश्चिम बंगाल मधील दुसऱ्या व्यक्ती आहेत. यापूर्वी Brojo Roy यांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाल्यानंतर सरकारी रुग्णालयात त्यांचे pathological autopsy करण्यात आली. दरम्यान, कोविड-19 चा संसर्ग झालेले डॉ. विश्वजित चक्रवर्ती यांनी देखील यासाठीच देहदान केले आहे. असा महत्त्वाचा निर्णय घेणारे ते राज्यातील तिसरे व्यक्ती ठरले आहेत.

बोस यांना उत्तर कोलकाता मधील बेलिया घाट येथील रुग्णालयात 14 मे रोजी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दोन दिवसांत त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती बोस यांची नात डॉ. टिस्टा बसू यांनी दिली आहे. माझ्या आजीवर मंगळवारी  RG Kar Medical College and Hospital मध्ये pathological autopsy करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर pathological autopsy होणारी ही देशातील पहिली महिला बॉडी होती, अशी माहिती टिस्टा बसू यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे.

आपल्याला कोरोना व्हायरसबद्दल अधिक माहिती नाही. हा एक संपूर्ण नवीन आजार असून या आजारामुळे आपल्या अवयवांवर होणारा परिणाम समजणे गरजेचे आहे. pathological autopsy वरुन हे करण्यास नक्कीच यश येईल, असे बसू यांनी सांगितले. (भारतात कोविड-19 च्या तिसरी लाटेचे स्वरुप कसे असेल? संसर्ग कमी करण्यासाठी काय आहेत उपाय? जाणून घ्या तज्ञांचे मत)

ज्योत्स्ना बोस यांचा जन्म 1927 मध्ये बांग्लादेशमधील चित्तगाव येथे झाला. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्या आपले शिक्षण पूर्ण करु शकल्या नाहीत आणि ब्रिटिश टेलिफोन्समध्ये त्यांनी ऑपरेटरचा जॉब निवडला. कालांतराने ट्रेड युनियन चळवळीत बोस यांनी सहभाग घेतला होता. त्यांचा विवाह ट्रेड युनियनमधील मोनी गोपाल बसू यांच्यासोबत झाले होते. राजकीय आणि सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग होता.