Joshimath Satellite Images: जोशीमठाचं अवघ्या १२ दिवसांत ५.४ सेमी भुस्खलन, इस्त्रोकडून सॅटेलाईट इमेज जारी

तसेच जोशीमठ या गावास आता भूस्खलन क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आले आहे.

डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधी दरम्यान उत्तराखंड येथील जोशीमठ अवघ्या 12 दिवसांत 5.4 सेंटीमीटरपर्यंत खचल्याची माहिती इस्त्रोकडून जारी करण्यात आली आहे. संबंधित अधिकृत सॅटेलाइट इमेजेस इस्त्रोकडून जारी करण्यात आल्या असुन त्यातून जोशीमठातील पृष्ठभागात झालेले मोठे बदल  दिसून येत आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने उत्तराखंड येथील जोशीमठ शहर हळूहळू जमिनीखाली बुडत असल्याच्या उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध केल्या आहेत. केवळ  12 दिवसांत म्हणजे 27 डिसेंबर 2022 ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान 5.4 सेमी वेगाने भुस्खलन झाल्याची धक्कादायक बाब जारी केलेल्या या सॅटेलाईल इमेज मधून दिसुन आली आहे. सबसिडन्स झोन मध्य जोशीमठ येथील ज्यात आर्मी हेलिपॅड आणि नरसिंग मंदिर परिसरातील उपग्रह प्रतिमा इस्त्रोकडून जारी करण्यात आल्या आहेत. तसेच जोशीमठ या गावास आता भूस्खलन क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आले आहे.

 

जोशीमठ येथील काही दिवसांतच शेकडो घरांना तडे गेल्याने परिसरातील  निवासस्थाने धोकादायक झाले आहेत. तरी जोशीमठ येथील कुटुंबांना स्थलांतरित करावे अशा सुचना चमोली जिल्हा प्रशासनाने जोशीमठला येथील राहिवाशांना दिल्या आहेत. सरकारने ₹ 1.5 लाखांचे अंतरिम मदत पॅकेज जाहीर केले असुन पुनर्वसन पॅकेजच्या कामाला सुरुवात झाली आहे. कालचं जोशीमठ येथील दोन हॉटेल पाडण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक आणि रहिवाशांच्या विरोधामुळे काही दिवस यांत्रिक तोडण्याचे काम रखडले आहे. (हे ही वाचा:- Shocking Photos Of Sinking Joshimath: जोशीमठ 'सिंकिंग झोन' म्हणून घोषीत, खचणारी जमीन आणि भेगाळलेल्या भींती; पाहा धक्कादायक फोटो)

Joshimath  

 

Joshimath 1 

 

Joshimath 2

 

तरी जोशीमठातील शेकडो घरांना पडलेले तडे म्हणजे केदारनाथ प्रलयाची पुनरावृत्तीचं का अशी चर्चा होत आहे. तर हो जोशीमठाबाबत ही शक्यता नाकारता येणार नाही. मुळात नाजुकशा पृथ्वीच्या पृष्ठभागावर वसलेल्या गावात येणाऱ्या पर्यटकांची संख्या, कॉंक्रेटच्या इमारती, भलेमोठे रस्ते बांधल्या गेल्यामुळे येथील पर्यावरणाचं संतुलन बिघड्यामुळे असे मोठे बदल बघायला मिळाल्याचं तज्ञांचं मत आहे. तरी अचानक हे भुसखलन होण्यामागचं कारण काय, मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा हा एक लहान इशारा तर नाही ना अशा चर्चेंना उधाण आलं आहे.