डोडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, परिसरात 2 ते 3 दहशतवादी लपल्याची भीती
यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली.
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये सोमवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. डोडा येथील देसा वन परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. यानंतर घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला. देसा येथे शोध मोहिमेदरम्यान, दहशतवाद्यांच्या एका गटाने कथितरित्या सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर चकमक झाली. चकमक सुरू झाल्यानंतर भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार सुरू झाला. (हेही वाचा -Chhattisgarh: सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार; या वर्षात आतापर्यंत 139 नक्षलवादी ठार)
पाहा पोस्ट -
या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. काही काळ दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू होता, त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.
चकमकीनंतर संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 ते 3 दहशतवाद्यांचा एक गट या परिसरात लपला आहे.