CAA-NRC Protest: नागरिकत्व दुरूस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात दिल्ली येथील शाहीन बाग येथे आज 11 वाजता पत्रकार परिषद ; 30 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना घडामोडींचा वेधही इथे घेतला जाणार आहे. त्यामुळे आज दिवसभरातील घटना, घडामोडींचे ताजे आणि ठळक तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही लेटेस्टली मराठीसोबत जोडलेले राहा आणि आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.
नागरिकत्व दुरूस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात दिल्ली येथील शाहीन बाग येथे आज 11 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे. अंदोलनकर्त्या महिलाच पत्रकार परिषद संबोधित करणार आहेत.
दिल्लीत येत्या 8 जानेवारीला विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच राजकीय नेते एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभुमीवर आम आदमी पक्षाने गेल्या 5 वर्षात खोटेपणा करण्याव्यतिरिक्त काहीच केले नसल्याची टीका केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केली आहे.
फरार डायमनटॅर नीरव मोदीला 27 फेब्रुवारी 2020 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर 11 मे रोजी पाच दिवसांच्या प्रत्यार्पणाची सुनावणी सुरू होणार आहे.
गोव्यात येत्या 1 फेब्रुवारी पासून स्थानिकांसाठी कसिनोवर बंदी घालण्यात येणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला आहे. कसिनो फक्त पर्यटकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
जामिया इस्लामिया येथे एका तरुणाकडून पोलिसांवर आज दुपारच्या वेळेस गोळीबार करण्यात आला. त्यावेळी या तरुणाने मी तुम्हाला आझादी देतो म्हणत बेछूट गोळीबार केल्याने राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, लोकशाही देशात अद्याप नाथूराम गोडसे यांच्यासारखी माणसे जिवंत आहेत.
नीतीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांचा केवळ वापर केला आहे. त्यामुळे त्यांनी आता राष्ट्रीय जनता दलात यावे आणि आमच्यासोबत काम करावे, अशी ऑफर दिली आहे. प्रशात कुशोर यांना बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलातून नुकतेच बाहेर घालवले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार हत्या प्रकरणातील दोषी अक्षय कुमार याची क्युरेटीव्ह याचिका गुरुवारी फेटाळून लावली. न्यायमूर्ती एन व्ही रमणा, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती आर एफ नरीमन न्यायमूर्ती आर भानुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच सूर्याचा पृष्ठभाग स्पष्ट दाखवणारा फोटो मिळाला आहे. होय, हवाई येथील हवाई येथील राष्ट्रीय विज्ञान संस्था ( हे यश मिळवू शकली आहे. या संस्थेच्याडेनियल इनोये सोलर टेलिस्कोप ने टीपले आहेत. हा टेलिस्कोप जगातील सर्वात मोठा टेलीस्कोप म्हणून ओळखला जातो.
नागरिकत्व विरोधी कायद्याविरोधात राजधनी दिल्ली येथील राजघाटावर काढण्यात आलेल्या मोर्चात एका तरुणाने गोळीबार केला आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत जामिया मिलीया परिसरातून हा मोर्चा राजघाट पर्यंत काढण्यात आला आहे. दरम्यान, मोर्चाला सुरुवात होण्यास काहीच अवधी होता. तोपर्यंत ही घटना घडली. दरम्यान, या गोळीबारात एक तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणावर दिल्ली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसानी गोळीबार करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. मोर्चा नियोजित कार्यक्रमानुसार पुढे जात आहे.
पाथरी माजलगाव रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील दोन्ही तरुण पाथरी तालुक्याती किनोळा गावचे रहिवासी आहेत. दीपक कणसे आणि युवराज मगर अशी या दोघांची नावे आहेत. मृत दीपक अच्युतराव कणसे हे वरखेड ग्रामपंचायतचे सदस्य होते.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी भाजपता हात असल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे. मात्र यावर उत्तर देत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी असे म्हटले आहे की, या प्रकरणातील तुमच्याकडे पुरावे असल्यास अटक करण्यात यावी. तसेच जवळची माणसे अडचणीत येतील म्हणून तपास एनआयएकडे दिला आहे.
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. उद्यापासून सुरू होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमवर ही बैठक बोलावण्यात आली होती.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी आणि नथूराम गोडसे यांची विचारधारा एकच असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच, नरेंद्र मोदी यांच्या इतकीही हिंमत नाही की ते ठामपणे सागू शकत नाहीत की, ते गोडसे यांच्यावर श्रद्धा ठेवतात.
भक्तांनी पुजाऱ्यांवर केवळ जबरदस्तीच केली नाही तर, भक्तांनी या पुजाऱ्यास पूजेसाठी सोबत न येणाऱ्या या पुजाऱ्याला चक्क खेचत आणि फरफटत पुजास्थळी नेले. पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथ हा प्रकार घडला. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू आगमन होते. या वेळी सरस्वतीची पूजा करण्याचा पश्चिम बंगाल राज्यात प्रघात आहे. दरम्यान, पूजा सांगण्यासाठी पुजाऱ्याला फरफटत नेल्याचा एक व्हडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus). त्यामुळे जगभरातील शेकडो नागरिकांना हाकनाक गमवावा लागलेला जीव. त्यामुळे जगभरातील वैद्यकीय संशोधकांना मिळालेले आव्हान आणि निर्माण झालेली विचीत्र परिस्थिती. या सरगळ्यातून जगभरातील देश सध्या मार्गक्रमण करत आहेत. दुसऱ्या बाजूला कोरोना व्हायरसमुळे चीनी आणि अप्रत्यक्षरित्या जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा नकारात्मक परिणाम होऊ शकतो असे तज्ज्ञ दावा करत आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसचे हे लोन कुठे घेऊन जाणार याबाबत अनेकांना चींता आहे. भारत आणि महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसने हातपाय पसरु नयेत याबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. या सर्व घटना घडामोडींव आपण लक्ष ठेऊन असणार आहोत.
दुसऱ्या बाजूला राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) , राष्ट्रीय काँग्रेस (National Congress) प्रणित महाविकासआघाडी (Maha Vikas Ahadi) सरकार आता जोमाने कामाला लागले आहे. हे सरकार विविध निर्णय घेऊ लागले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या युती सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना विद्यमान सरकारने स्थगिती दिली आहे. या निर्णयांवर फेरविचार सुरु आहे. मुंबई मेट्रो 'आरे' कारशेड हासुद्धा स्थगिती मिळालेला एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय. मुंबई मेट्रोचे कारशेड आरे येथे बनविण्यासाठी जागा सुनिश्चित केली होती. मात्र, प्रचंड प्रमाणावर वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास या कारणांमुळे पर्यायी जागेचा शोध घेण्यासाठी सरकारने एक समिती नेमली होती. या समितीनेही हे कारशेड नियोजित जागेवरच व्हावे असा निर्वाळा दिल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. त्यामुळे मुंबई मेट्रो आणि आरे कारशेड याबाबत आज काय घडामोडी घडतात याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, राजधानी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहात आहे. प्रत्यक्ष मतदानाची तारीख जवळ येत असल्याने प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 (Delhi Legislative Assembly election 2020) मध्ये सत्ताधारी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष विरुद्ध भाजप, काँग्रेस आणि इतर पक्ष असा सामना रंगत आहे. खास करुन इथे आम आदमी पक्ष विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या राजकारणात आप तसा नवा पक्ष आहे. पाच सात वर्षांपलीकडे या पक्षाला राजकारणाचा अनुभव नाही. असे असतानाही अत्यंत नवख्या असलेल्या या पक्षाने या आधीच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधात असलेल्या काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला धूळ चारली होती. त्यामुळे निवडणूक प्रचारात कोण आघाडी घेतंय, काय आरोप प्रत्यारोप होतात याबाबत उत्सुकत आहे.
दरम्यान, वरील मुद्द्यांसह स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना घडामोडींचा वेधही इथे घेतला जाणार आहे. त्यामुळे आज दिवसभरातील घटना, घडामोडींचे ताजे आणि ठळक तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही लेटेस्टली मराठीसोबत जोडलेले राहा आणि आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)