उत्तर प्रदेश: काँग्रेस जेष्ठ नेते राजनारायण गर्ग यांचा रस्ता अपघातात मृत्यू; 29 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबई सह महाराष्ट्र आणि देशभरातील ताज्या बातम्या अवघ्या एका क्लिक वर जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीला नक्की भेट द्या.

30 Jan, 03:15 (IST)

 

काँग्रेसचे जेष्ठ नेते राजनारायण गर्ग यांचे रस्ता अपघात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेश येथील चित्रकूट जिल्ह्यातील कस्बे परिसरात आज मंगळवारी सायंकाळी घडली. 

30 Jan, 02:05 (IST)

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. 

> पीएचडीधारक अधिव्याख्यात्यांना 1996 पासून दोन वेतनवाढी

> रसायन तंत्रज्ञान संस्था, तंत्रशास्त्र विद्यापीठातील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी

> पुणे येथे अध्यापकांसाठी कंपनी कायद्यान्वये प्रशिक्षण संस्था

> सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून होणार

> तंत्रश‍िक्षण संचालनालयाच्या संस्थांमधील श‍िक्षकीय, समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग

30 Jan, 01:12 (IST)

27 मार्च रोजी 100 व्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन सांगली येथे होणार आहे. 27 मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची निवड झाली आहे.   

29 Jan, 23:47 (IST)

एअर इंडियाः एआय 348 / 349- मुंबई- दिल्ली- शांघाय विमान उड्डाण 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे. देशात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या भीतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

29 Jan, 22:59 (IST)

मुंबईमध्ये दरवर्षी LGBTQ समुदायाचा Queer Azadi March आयोजित केला जातो. या समुदायासाठी काम करणारी संस्था हमसफर ट्रस्ट हा मार्च आयोजित करते. मात्र यावर्षी CAA-NRC या मुद्द्याला LGBTQ March शी जोडण्यात आल्याने यंदाची परेड रद्द करण्यात आली आहे. 

29 Jan, 21:46 (IST)

दिल्ली पोलिसांनी आज  जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात CAA विरोधात आंदोलन करणार्‍या 70 जणांचे फोटो रिलीज केले आहेत. 15 डिसेंबर 2019 दिवशी विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निषेध केला होता.

29 Jan, 21:35 (IST)

आज बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंदला हिंसक वळण लागलं. काही काळ पोलिस आणि आंदोलकांना संघर्षाचं वातावरण  निर्माण झालं होतं.  

29 Jan, 20:17 (IST)

पुणे शहरामध्ये आज CAA, NRC ला विरोध करणारे सुमारे 250 आंदोलक पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

29 Jan, 20:02 (IST)

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने काही प्राथमिक उपाय सूचवले आहेत. या उपायांबाबत माहिती देणारे एक ट्विट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे.

ट्विट

29 Jan, 19:46 (IST)

आपली मुंबई स्वच्छ मुंबई असे म्हणत मुंबई महापालिकेने स्वच्छता सर्वेक्षणात मतदान करण्याचे अवाहन नागरिकांना केले आहे. त्यासाठी एक खास ट्विट करत पालविकेने आपल्या ट्वटर हँडलवर मलम्मा नावाच्या एका 54 वर्षीय महिलेचा फोटोही ट्विट केल आहे. तसेच #SwachhSurvekshan2020Mumbai #MumbaiVijayiAamhiVijayi हे खास हॅशटॅगही वापरले आहेत.

ट्विट

29 Jan, 19:28 (IST)

कोरोना व्हायरसने चीन आणि जगभरातील अनेक देशांमसोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस संसर्गापासून वाचण्यासाठी शक्यतो चीन प्रवास टाळा असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतीय प्रवाशांना दिला आहे.

ट्विट

29 Jan, 18:22 (IST)

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बॅटमिंटनपटू सायना नेहवाल हीने भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणूकीमध्ये ती भाजपाचा प्रचार करणार आहे. आज सायना नेहवाल सोबत तिच्या बहिणीने देखील भाजपात प्रवेश केला आहे.

29 Jan, 17:38 (IST)

नाशिक शहरात रिक्षा-बस मध्ये झालेल्या भीषण अपघातात 26 ठार तर 32 जखमी आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे तर जखमींच्या उत्तम स्वास्थ्य आणि उपचारांना सकारात्मक प्रतिसाद  मिळावे यासाठी प्रार्थना केली आहे.

29 Jan, 16:31 (IST)

नाशिक मध्ये विहिरीत रिक्षा आणि बस कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये 26 ठार झाले असून 32 जण जखमी आहेत. प्रशासनाने या दुर्घटनेत अडकेल्या प्रवाशांसाठी सुरू केलेलं बचावकार्य संपवलं आहे. राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाची मदत करणार आहेत.

29 Jan, 16:14 (IST)

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश याचे फाशी टाळण्याचे सारे कायदेशीर मार्ग संपले आहेत. आज मुकेशची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून त्याला फाशी होणार हे आता निश्चित झाले आहे. 

29 Jan, 15:35 (IST)

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी अक्षय कुमार यांने सर्वोच्च न्यायालयामध्ये Curative Petition दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणातील चारही आरोपींना 1 फेब्रुवारी दिवशी फाशी दिली जाणार आहे.  

29 Jan, 14:37 (IST)

बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आज (29 जानेवरी ) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान यासाठी मध्य रेल्वेच्या कांजूर मार्ग स्थानकांत लोकल अडकवण्याचा प्रयत्न केल्याने वाहतूक किमान 20 मिनिटं विस्कळीत झाली आहे.


नागरिकत्त्व दुरूस्ती कायदा, एनआरसी आणि ईव्हीएमच्या विरोधात आज (29 जानेवारी) बहुजन क्रांती मोर्चा कडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर अद्याप वाहतूक किंवा इतर व्यवस्थेवर कोणत्याही परिणाम मुंबई सह महाराष्ट्रात आढळून आलेला नाही मात्र पोलिसांकडून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. देशभरात सध्या सीएए आणि एनआरसीला विरोध होत आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात असणार्‍या संघटनांचा बहुजन क्रांती मोर्चाला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात परळी व्यापारी संघटनेने आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान मागील महिन्याभरात सतत बंद होत असल्याने त्याचा आर्थिक फटका व्यापारांना होत आहे त्यामुळे आजच्या भारत बंदमध्ये सहभागी न झाल्याचं सांगण्यात आले आहे. मुंबईत कांजूरमार्ग स्थानकाजवळ बहुजन क्रांती मोर्चाचा रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असून दरम्यान काही काळ वाहतूक विस्कळीत करण्याचा प्रयत्न झाला होता.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

दरम्यान भारत बंद मध्येही सहभागी होण्यासाठी बहुजन क्रांती मोर्च्याच्या  कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे.  शिवाजी चौकामध्ये हॉकी स्टिक आणि रॉडने मारहाण झाली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement