'शिवभोजन थाळी' योजनेची अंमलबजावणी राज्यात 26 जानेवारी 2020 पासून होत आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 'शिवभोजन' केंद्रे सुरू होणार आहेत. या योजनेसाठी शासनाने चालू वित्तीय वर्षात, उर्वरित तिमाहीसाठी 6.48 कोटी रुपयांची रक्कम अनुदान म्हणून उपलब्ध करून दिली आहे
ग्लोबल करप्शन परसेप्शन इंडेक्स 2019 मध्ये भारताचे स्थान घसरले आहे. भारत मागच्यावर्षी 78 व्या स्थानावर होता, आता यंदा भारताचे स्थान 80 आहे. याचाच अर्थ मोदी सरकारच्या काळात भारतामधील भ्रष्टाचार वाढला आहे.
'ही माझी वचनपूर्ती नाही, तर त्या दिशेला टाकलेले पहिले पाऊल आहे. भाजपने ज्या प्रकारे आमच्याशी खोटेपणा केला, त्यानंतर विरोधकांशी मी हातमिळवणी केली मात्र अजूनही आमचा भगवा रंग बदलला नाही, आम्ही हिंदुत्व सोडले नाही.' - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली होती. त्यावेळी बाळासाहेबांबरोबर काम केलेल्या 11 ज्येष्ठ शिवसैनिकाच्या हस्ते, आज उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला गेला, तसेच रश्मी ठाकरे यांची ओटी भरली गेली.
मा. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असे वचन दिले होते. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन व स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. याच वचनाची झालेली पूर्ती साजरी करण्यासाठी शिवसेनचा वचनपूर्ती सोहळा आयोजित केला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सत्काराने या सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी गुरुवारी (23 जानेवारी) ब्रिटीश सरकारच्या ब्रेक्सिट कायद्यास मान्यता दिली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ब्रसेल्समध्ये जॉन्सन यांनी ब्रिटनने युरोपियन युनियनमधून माघार घेण्याबाबतचे विधेयक मंजूर केले. हे विधेयक 31 जानेवारीपर्यंत कायद्यात रुपांतरीत होईल.
इंग्लंड, अमेरिकेहून एखादा नागरिक भारतात आला तर त्याला विचारले जाते बाबारे इथे का आला आहेस? पण, बांग्लादेशी, पाकिस्तानी मुस्लिमांना असे विचारले जात नाही. त्यांना परत पाठवण्याचे काम केंद्र सरकार करत असेल , बांग्लादेशी, पाकिस्तानी मुसलमान हाकलून देण्यासाठी मनसे केंद्र सरकारला मदत करेन, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
मी माणूसघाणा व्यक्ती नाही. विरोधाला विरोध करत नाही. रंग तर कधीच बदलत नाही. सत्तेमध्ये जाण्यासाठी कधीही रंग बदलणार नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेला टोला लगावला
केवळ अडीच हजार रुपयांत बांग्लादेशी नागरिक भारतात येतात. उद्या जेव्हा काही घडेल तेव्हा भारताच्या सैनिकांना भारताबाहेर नव्हे भारतातच लढावे लागेल. खरे म्हणजे पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडून टाकायला हवे आहेत. पहिली ती समझोता एक्सप्रेस बससेवा बंद करायला हवी-राज ठाकरे
भाषा ही कोणत्याही धर्माची नसते ती प्रदेशाची असते. असे नसते तर बंगाली भाषेचा आग्रह धरत बांग्लादेशी नागरिकांनी बंगाली भाषेचा आग्रह का धरला असता, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.
एकाच वेळी मी मराठीही आहे आणि हिंदूही आहे. त्यामुळे मराठी भाषेला जर कोणी नख लावण्याचा प्रयत्न कराल तर, मी मराठी म्हणून अंगावर जाईन. जर माझ्या धर्माला नख लावाल तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. आम्ही हिंदू आहोत म्हणून मुस्लिमांचा द्वेश करत नाही. आम्ही राष्ट्रपती अब्दुल कलाम, जावेद अख्तर अशा लोकांचे कार्य नाकारु शकत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज पक्षाचे दोन झेंडे हाती घेत आहे. यातील पहिला झेंडा हा छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असलेला झेंडा आहे. दुसरा आहे इंजिन हे निवडणुक चिन्ह असलेला. त्यापैकी राजमुद्रा असलेला झेंडा हा निवडणुकीत वापरायचा नाही. तसेच, तो इकडेतिकडे वेडावाकडा पडणार नाही, याची काळजी घ्या, असे राज ठाकरे म्हणाले.
पक्ष स्थापन केला तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता तो म्हणजे हा झेंडा आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा का बदलला याबाबत राज ठाकरे यांनी भाष्य केले.
पक्ष संघटनेत काम करताना अनेकदा पदावर काम करणारा नेता आणि कार्यकर्ता यांची वयं सारखी असतात. पण, असे असले तरी, त्या पदाचा मान सर्वांना राखावाच लागेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप काळजीपूर्वक वापरा. पक्ष, संघटना याबाबत अंतर्गत निर्णय, माहिती अथवा इतर विषय चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर येणा नाही याची काळजी घ्या, अन्यथा त्या व्यक्तीला मी पदावरुन दूर केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
झेंडा आवडला का? असे म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला प्रतिसाद देत मोठ्या जल्लोषात प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन झाले आहे. थोड्याच वेळात ते उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधीत करणार आहेत. मनसेचे महाअधिवेशन मुंबईत पार पडत आहे. या अधिवेशनास राज्यातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे महाअधिवेश आज मुंबई येथे पार पडत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसे कार्यकर्ते या अधिवेशनासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळात कार्यकर्त्यांना संबोधीत करणार आहेत.
राज्यात सरकार बदलून आता जवळपास दोन महिने होत आले. परंतू, विधिमंडळातील प्रशासन अद्यापही जुन्या सरकारच्याच स्मृतिंमध्ये वावरत असल्याचे पुढे आले आहे. निमित्त ठरले आहे. विधिमंडळ दिनदर्शिकेचे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांन पदग्रहण केले असतानाही विधिमंडळाच्या दिनदर्शिकेवर मात्र मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचेच छायाचित्र छापले गेले आहे. विधिमंडळ दिनदर्शिका 2020 च्या जानेवारी महिन्याच्या पानावर हे छायाचित्र दिसत आहे. विशेष म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांच्या ऐवजी आगोदरचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे छायाचित्र छापले आहे. त्यामुळे विधिमंडळ प्रशसनाच्या या कारभारावर टिका होऊ लागली आहे.
महाराष्ट्र मंत्रिमंडळ समन्वय समिती मध्ये काँग्रेस कडून अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाले आहे. महाविकाआघाडीच्या तीन मित्र पक्षातून प्रत्येकी दोन सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.
आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या बहुप्रतीक्षित मनसे महाधिवशेनात (MNS Maha Adhiveshan) येत्या काळासाठी पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज, गुरुवारी गोरेगाव (Goregaon) येथे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील बदलत्या राजकीय घडामोंडीवर भाष्य करतानाच पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करणार आहेत. मागील काही दिवसांपासून मनसेचा झेंडा भगव्या रंगात बदलून झेंड्यावर सोनेरी रंगाच्या षटकोनात राजमुद्रेप्रमाणे महाराष्ट्र धर्म लिहिले असेल अशी चर्चा आहे. ही भूमिका घेऊन पक्ष आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जनतेला साद घालणार असल्याचे म्हंटले जात होते, मात्र यात कितपत तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी आजच्या अधिवेशनाची वाट पाहावी लागणार आहे.
आज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यानिमित्त आज सकाळ पासूनच मुंबईतील शिवतीर्थावर गर्दी पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या वतीने हे औचित्य साधून वांद्रे कुर्ला संकुल येथील MMRDA मध्ये वाचपुरती जल्लोष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या फळीच्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार केला जाणार आहे. दुसरीकडे, आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची देखील 123वी जयंती आहे, यानिमित्ताने आज सकाळपासून अनेक राजकीय मंडळींनी ट्विटरच्या माध्यमातून नेताजींना अभिवादन केले आहे.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
दरम्यान, आज दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या दोन सभा दिल्लीत पार पडणार आहेत. तर सर्वोच्च न्यायालयात जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटवण्याच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी होणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)