मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांचा बंद अखेर मागे; 19 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आज मुंबईत सालाबादप्रमाणे गोल्ड लेबलचा दर्जा असलेल्या मुंबई मॅरोथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या मॅरोथॉनच्या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह जयंत पाटील यांची उपस्थिती दिसून आली.

20 Jan, 05:08 (IST)

साईबाबा जन्मस्थळावरून सुरु झालेला वाद हा चिघळत चालला असून त्याचे रुपांतर आज सुरु झालेल्या बंदात झाले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर हा बंद अखेर मागे घेण्यात आला आहे. शिर्डी कृती समितीचे माजी विश्वस्त कैलास कोते यांनी याबाबतची घोषणा केली. आज रात्री 12 नंतर हा बंद मागे घेण्यात येईल. उद्या मुख्यमंत्र्यांसोबत होणा-या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास आम्ही पुढील दिशा ठरवू असे सांगण्यात येत आहे.

20 Jan, 03:32 (IST)

उद्या म्हणजेच 20 जानेवारी रोजी दिल्लीच्या मुख्यालयात भाजप पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उमेदवारी प्रक्रिया होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्र्यांची तातडीची बैठक देखील बोलावण्यात आली आहे.

20 Jan, 24:40 (IST)

इन्स्टंट मॅसेजिंगसाठी सर्वाधिक प्रमाणावर वापरले जाणारे व्हॉट्सअॅप सध्या डाऊन आहे. जगभरातील युजर्सना याचा फटका बसत आहे. सायंकाळी 4 वाजल्यापासून व्हॉट्सअॅप डाऊन असल्याची माहिती मिळाली आहे.

19 Jan, 23:37 (IST)

शिर्डी बंद प्रकरणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ शिर्डीत दाखल झाले असून त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. जन्म स्थळावरून राजकारण न करता, बंद करुन वाद संपणार नाही असे भुजबळांनी यावेळी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. दोन्ही बाजू ऐकून घेऊन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असे छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

19 Jan, 22:53 (IST)

भारतीय जनता पार्टीच्या सर्व केंद्रीय मंत्र्याची उदया म्हणजेच 20 जानेवारील तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. दिल्लीतील पक्ष कार्यालयात ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

19 Jan, 21:59 (IST)

कोल्हापूर येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचे शरद पवार यांच्या हस्ते लोकापर्ण सोहळा पार पडला आहे. गेल्या 50 वर्षांत कोल्हापूर असो किंवा अन्य कुठेही, शाहू महाराजांसंबंधी कुठलाही सोहळा असला तरी माझी उपस्थिती चुकलेली नाही असे ही शरद पवार यांनी म्हटले आहे.

19 Jan, 21:27 (IST)

दिल्ली येथे विधानसभा निवडणूकीच्या तिकीट वाटपावरुन भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले आहे.

19 Jan, 21:05 (IST)

हरिश्चंद्र गडावरुन रॅपलिंग करताना दरीत कोसळून प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी अनेकांकडून दु:ख व्यक्त करण्यात येत असून राष्ट्रवादी पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा ट्वीटच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Tweet:

19 Jan, 20:14 (IST)

कर्नाटक सरकार, कानाडी लोकांकडून मराठी भाषिकांवर अन्याय असल्याचे विधान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

19 Jan, 19:44 (IST)

गोपीनाथ मुंडे यांचे वरळी मधील कार्यालय येत्या 26 जानेवारी पासून सुरु होणार होते. मात्र आता हे कार्यालय 5 फेब्रुवारी पासून पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.

Tweet:

19 Jan, 19:21 (IST)

महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या हेतूने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, आदी भाजप नेते दिल्लीकडे रवाना झाले आहेत. 

19 Jan, 18:17 (IST)

26 जानेवारीला मुंबईत नाईट लाईफ सुरु करणे अशक्य असल्याचे मोठे विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. पोलीस यंत्रणेवरील ताण वाढेल याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. 

19 Jan, 18:02 (IST)

अहमदनगर येथे ट्रेकिंग दरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गिर्यारोहक अरुण सावंत असे नाव असून त्यांचा  कोकण कड्यावरुन रॅपिलिंग करताना पडून मृत्यू झाला आहे.

19 Jan, 17:47 (IST)

प्रकाश आंबेडकर घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून येत्या 24 तारखेला  होणाऱ्या 'महाराष्ट्र बंद' बाबातच्या मुद्द्यावर चर्चा करणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

19 Jan, 17:11 (IST)

महाराष्ट्राचे प्रसिद्ध मुर्तिकार राम सुतार करणार अयोध्येतील श्री रामाच्या मुर्तीची निर्मिती करणार आहेत. तर अयोध्याच्या ट्रस्टची 9 फेब्रुवारीला स्थापना होणार असून पुढील काम त्यानंतर सुरु होणार आहे. तत्पूर्वी अयोध्येतील श्री रामाची मुर्ती 215 मीटर उंच असणार आहे.

19 Jan, 16:51 (IST)

मुंबईतील कडाक्याच्या थंडीत पहाटे मॅरेथॉनला सुरुवात झाली असली तरीही या स्पर्धेला आता गालबोट लागले आहे. कारण या स्पर्धेत एका 64 वर्षीय एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. गजानन माळजकर असे वृद्ध व्यक्तीचे नाव असून मॅरेथॉन दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

19 Jan, 16:40 (IST)

मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेत म्हणजेच एलिट रन मध्ये इथिओपिआचा धावपटूने बाजी मारली असून डेरारा हरीसा विजेता ठरला आहे.डेरारा हरीसाने मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.

19 Jan, 16:32 (IST)

'साई' नामाचा जप करत शिर्डी ग्रामस्थांचे द्वारकामाई समोर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यामध्ये मोठ्या संख्यने नागरिकांनी आपला सहभाग दर्शवत  शांततेने शिर्डी बंदसाठी  रॅली काढली आहे. 

19 Jan, 16:11 (IST)

शिवसेना खासदार संजय राऊत बेळगाव येथून परतीच्या मार्गावर येण्यास निघाले आहेत. आज संजय राऊत हे हुतात्मा चौक येथे जाऊन अभिवादन करणार होते पण त्यापूर्वीच त्यांनी महाराष्ट्रात येण्यासाठी विमानतळावर पोहचले आहेत.

19 Jan, 15:41 (IST)

बेळगाव प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोब शरद पवार यांनी येडियुरप्पांशी चर्चा करावी असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. तसेच बेळागावातून महाराष्ट्रात गेल्यावर संजय राऊत  उद्धव ठाकरेंना येथील परिस्थितीबाबत सांगणार आहेत.

Read more


आज मुंबईत सालाबादप्रमाणे गोल्ड लेबलचा दर्जा असलेल्या मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या मॅरेथॉनच्या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह जयंत पाटील यांची उपस्थिती दिसून आली. यामध्ये तब्बल 55 हजार धावपटूंनी सहभाग घेतला असून पोलिसांसह कडेकोड बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच वाहतुकीच्या मार्गात मॅरेथॉन दरम्यान बदल करण्यात आला आहे.

पाथरीला साईबाबांचे जन्मस्थळ घोषित करण्याला तीव्र विरोध करत शिर्डीत आजपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. शिर्डीमध्ये पहिल्यांदाच बेमुदत संप पुकारण्यात आला असला तरीही साईबाबांचे मंदिर भक्तांसाठी दर्शन घेण्यासाठी सुरु राहणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या बेळगाव दौऱ्यावर गेले असून आज हुतात्मा चौकाला अभिवादन करण्यासाठी जाणार आहे. तत्पूर्वी शनिवारी संजय राऊत यांच्या बेळगावातील दौऱ्यामुळे तणावाचे वातावरण दिसून आले होते. मात्र पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्यांनी नाथ पै व्याख्यानमालेचं उद्घाटन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांची मुलाखत घेण्यात आली. गोगटे रंगमंदिरात राऊतांची ही मुलाखत झाली. मात्र आज संजय राऊत यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now