विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची न्यूझीलंड दौर्यावर जाण्यास सज्ज आहे. हा त्यांचा यावर्षात पहिलाच परदेश दौरा असणार आहे. रविवारी या दौर्याचा संघ जाहीर करण्यात आला असून भारताने आपल्या संघात काही बदल केलेले दिसून आले.
दिल्लीतील भाजप कार्यालयात आज एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ असे या पुस्तकाचे नाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्यात आली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी सर्वप्रथम टीका केल्या तर आता खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर खानापूर तालुक्यात एका मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, या दोन राज्यांमधील सीमावादाचा फटका नुकताच साहित्यिकांनाही बसला आहे. कर्नाटकातील खानापूर तालुक्यात असलेल्या इदलहोड येथे होणार असलेल्या गुंफन मराठी साहित्य संमेलनाला जाणाऱ्या मराठी साहित्यिकांना खुद्द पोलिसांनीच प्रवेश नाकारला आहे. तसेच मराठी साहित्यिकांना गावबंदी घालण्यात आली आहे. यासर्वामुळे मराठी साहित्यिकांमध्ये संतप्त भावना पसरली आहे.
एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या आईकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. श्रीकांत सबनीस नावाच्या व्यक्तीने त्याच्या आईकडून, वयाच्या 2 व्या वर्षी मुंबईत एकट्यालाच सोडले आणि नंतर मुलगा म्हणून स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे 1.5 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) देशात लागू झाला आहे. अनेक ठिकाणी याबाबत निषेधही होत आहेत. आज कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर आणि पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सुभाष चौपड़ा नागरिकत्व कायद्याच्या विरोधात, जामिया मिलिया इस्लामिया यथे सुरू असलेल्या निषेधांमध्ये सामील झाले. जामिया एका महिन्यापेक्षा जास्त काळ सीएए आणि एनआरसीविरोधात निषेध करीत आहे. आज या निदर्शनेत हे दिग्गज नेते सहभागी झाले होते.
शिवसेनेच्या 56 आमदारांपैकी 35 आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत, असे विधान नारायण राणे यांनी केले आहे. या गोष्टीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच पुढे, सध्याच्या सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येईल असेही ते म्हणाले.
विद्यापीठाच्या कुलगुरूंसह 208 शिक्षणतज्ज्ञांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, देशातील ढासळत्या शैक्षणिक वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली. यामध्ये त्यांनी सध्याच्या परिस्थितीला 'डाव्या विचारसरणीच्या एका छोट्या गटाला' जबाब्दादार ठरवले आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार पत्र म्हटले आहे, 'विद्यार्थी राजकारणाच्या नावाखाली डावे अजेंडा चालवीत आहे, त्यामुळे आम्ही अतंत्य निराश आहोत. जेएनयू ते जामिया पर्यंत एएमयू ते जाधवपूर या ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे शिक्षणाचे वातावरण बिघडण्याची चिन्हे दिसत आहेत.'
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची अलिकडे भाजपशी जवळीक वाढली आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी राज यांच्यावर निशाणा साधला आहे. वारंवार थुंकून चाटणे योग्य नाही, राज ठाकरे तुम्ही बाळासाहेबांच्या कुटुंबातील सदस्य आहात. किमान त्यांच्याकडे पाहून तरी असे वागू नका, असा खोचक सल्ला अबू आझमी यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.
आज सोलापुरात जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातील 6 सदस्यांवर भाजपला मतदान केल्याने निलंबनाची कारवाई केली. परंतु, आता यावर मोहिते पाटील गट आक्रमक झाला आहे. आधी अजित पवारांवर कारवाई करा, त्यानंतर आमच्या सदस्यांचे निलंबन करा', अशी मागणी जयसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे.
'जावईबापू आता डोंबिवलीकडे लक्ष द्या,' असा खोचक टोला मनसे पक्षाचे आमदार प्रमोद पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. मला कोणतीही टीका करायची नाही. परंतु, मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई आहेत. म्हणून त्यांनी डोंबिवली शहरावर लक्ष द्यावं, असंही पाटील म्हणाले आहेत. डोंबिवलीतील वाढते प्रदूषण, शहराची दुरावस्था आणि त्यासाठी जबाबदार एमआयडीसी तसेच महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे.
उत्तर प्रदेशातील मऊमध्ये रविवारी सकाळी समाजवादी पार्टीचे नेते बिजली यादव यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मोहम्मदाबाद परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी बिजली यादव यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (अधिक माहितीसाठी वाचा - उत्तर प्रदेश: समाजवादी पार्टीचे नेते बिजली यादव यांची गोळ्या घालून हत्या)
आगामी टी-20 विश्वचषकासाठी महिला क्रिकेट संघाची निवड झाली आहे. पुढच्या महिन्यात महिलांच्या टी-20 विश्वचषक सुरू होणार आहे. त्यासाठी आज महिला संघाची घोषणा झाली आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागात होणाऱ्या साहित्य संमेलनसाठी महाराष्ट्रातील साहित्यिकांना गावबंदी करण्यात आली आहे. कर्नाटकमधील खानापूर तालुक्यातील इदलहौंगमध्ये गुंफन मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार होते. पंरतु, मराठी साहित्यिकांना येथे गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारची मग्रुरी समोर आली आहे.
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर पुन्हा एकदा नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. गाईच्या पाठीवर हात फिरवल्यामुळे नकारात्मक विचार निघून जातात, असा अजब दावा त्यांनी केला आहे. मागील आठवड्यातदेखील यशोमती ठाकूर यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती.
न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याला टीम इंडियामधून बाहेर काढण्यात आले आहे. 24 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ पाच टी-20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी आज संघनिवड करण्यात आली. परंतु, हार्दिक पांड्या निवडीसाठी अपात्र ठरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाताजवळील बेलूर मठाला भेट देऊन स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर मोदींनी उपस्थित युवा वर्गाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सविस्तर भाष्य केलं. नागरिकत्व कायदा हा कोणाचेही नागरिकत्व काढून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा कायदा असल्याचे स्पष्ट केलं आहे.
सोलापूर जिल्हापरिषद निवडणुकीत भाजप समर्थक आघाडीला साथ दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या 6 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. अरुण तोडकर, सुनंदा फुले, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, शितलदेवी मोहिते-पाटील, गणेश पाटील, मंगल पाटील असं निलंबन करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी ही कारवाई केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारपासून दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, मोदी यांनी कोलकाता येथे बेलूर मठात जाऊन स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये 2 दहशतवाद्यांसोबत राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस उपअधीक्षकाला अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये चेकिंगदरम्यान ही कारवाई करण्यात आली. या दहशतवाद्यांसोबत गाडीत जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षकही होते. त्यामुळे या पोलीस उपअधीक्षकांनाही अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले पोलीस उपअधीक्षक यांना राष्ट्रपती पदक विजेता आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज (12 जानेवारी) जयंती आहे. जिजाबाई शहाजी भोसले यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला. राजमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ या नावांनीही त्या ओळखल्या जातात. यापूर्वी सिंदखेड नावाने ओळखले जाणारे ठिकाण आता बुलडाणा नावाने ओळखले जात आहे.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
आज त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक दिग्गज तसेच राजकीय नेत्यांनी त्यांना विनम्र अभिवादन केलं आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून जिजाऊंना विनम्र अभिवादन केलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)