जम्मू-काश्मिर: तंगधार-केरन सेक्टर येथे पाकिस्तानचे दोन जवान ठार
यावर भारतीय जवानांनी कारवाई करत पाकिस्तानकडून करण्यात येण्याऱ्या गोळीबाराचे सडेतोड उत्तर दिले.
जम्मू-काश्मिर (Jammu-Kashmir) येथील तंगधार-केरन (Tangdhar-Keran) सेक्टर भागात पाकिस्तान (Pakistan) कडून शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावर भारतीय जवानांनी कारवाई करत पाकिस्तानकडून करण्यात येण्याऱ्या गोळीबाराचे सडेतोड उत्तर दिले. तर कुपवाडा येथे सीमारेषेच्या काही भागात गोळीबार करण्यात आल्याने जवानांनी गोळीबार सुरु केल्याने त्यामध्ये पाकिस्तानचे दोन जवान ठार झाले आहेत.
असे सांगितले जात आहे की, पाकिस्तानला भारताने केलेल्या या कारवाईमुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मृत झालेल्या पाकिस्तानच्या जवानांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टर येथे ही पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये एक जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे.(मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे होणार भारतीय लष्कर उपप्रमुख)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने आज दुपारपासून तंगधार आणि केरन या भागात जोरदार गोळीबार सुरु केला. त्यावेळी सीमारेषेवर तैनात असलेल्या जवानांसह काही नागरिक स्थानिकांच्या ठिकाणी गोळीबार करण्याचे ठरविले होते.