जम्मू-कश्मीर मध्ये आजपासून फोन आणि इंटरनेट सेवा सुरु
तर जम्मू येथे टू जी स्पीडसह इंटरनेट सेवा नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे.
जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मध्ये आजापासून फोन आणि इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. तर जम्मू येथे टू जी (2G) स्पीडसह इंटरनेट सेवा नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. मात्र कश्मीर येथे इंटरनेट सेवा सुरु होण्यास थोडा वेळ लागणार आहे. जम्मूसह संबा, कठुआ, उधमपुर येथे सुद्धा टू जी स्पीडने इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. पण राजौरी येथे कलम 144 अंतर्गत रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंतच इंटरनेट सेवा सुरु राहणार आहे.
5 ऑगस्टपासून जम्मू-कश्मीर येथे टेलीफोन आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. कलम 370 हटवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवार पासून जम्मू-कश्मीर मधील शाळा-महाविद्यालये आणि सरकारी ऑफिसे सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.(जम्मू-कश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत, जवानांना हाय अलर्ट जाहीर)
मोदी सरकारने जम्मू-कश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून टाकण्यात आल्यानंतर कलम 144 लागू करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या 12 दिवसांपासून घाटी मध्ये सर्व टेलिफोन सेवा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र सध्या येथील परिस्थिती पूर्ववत होत असल्याचे सांगण्यात येत आहे.