जम्मू-कश्मीर: लष्कर-ए-तोयबा संघटनेचा कुख्यात दहशतवादी निसार अहमद डार याला अटक

जम्मू-कश्मीर येथे जवानांना 'लष्कर-ए-तोयबा' (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी संघटेचा कुख्यात निसार डार अहमद याला अटक करण्यात मोठे यश आले आहे.

Security Forces (Photo Credits: ANI)

जम्मू-कश्मीर येथे जवानांना 'लष्कर-ए-तोयबा' (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी संघटेचा कुख्यात निसार डार अहमद याला अटक करण्यात मोठे यश आले आहे. कुल्लन येथे सुरु असलेल्या गोळीबारादरम्यान डार याने तेथून पळ काढल्याने वाचला गेला. मात्र गोळीबारात पाकिस्तानच्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबा संघटनेचा डार हा नुकत्याच एका एन्काउंटर दरम्यान पळून जाण्यास यशस्वी झाला होता.

एएनआय यांनी दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री डार याला जवानांनी ताब्यात घेतले. श्रीनगर येथे डार हा लपून बसला होता. तर सुरक्षा यंत्रणेवर हल्ला करण्याचा कट रचला होता. मात्र पोलिसांना त्यांच्या गुप्तसुत्रांकडून डार बाबत माहिती देण्यात आली. तसेच गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून परिसरात सर्च मोहीम राबवण्यात आली आहे.(नक्षलवाद्यांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी राज्यात सार्वजनिक सुरक्षा कायदा लागू होणार)

ANI Tweet:

तर स्थानिक लोकांना सकाळी सहा वाजता घरातून निघणे आणि संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी घरी परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सैन्य आणि पोलिसांनी लोकांकडून सहकार्याची विनंती केली आहे. संशयितांच्या शोधात लष्कराला व पोलिसांनी शुक्रवारी डब्बर गाव खेरीज खेरी, गॅरेट, मंगलाई, पोथा या गावातही शोधमोहीम राबविली. यावेळी लोकांकडून संशयितांबद्दलही विचारपूस केली गेली. त्यांनी जंगलातही ऑपरेशन केले लष्कर आणि पोलिस तीन संशयितांचा शोध घेत आहेत ज्यांना एका बकरवाल कुटुंबाच्या घरात पाणी प्यायल्यानंतर सैन्याच्या लपलेल्या ठिकाण आणि मोगल रोडची माहिती मिळवायची होती.

रात्रीच्या अंधारात या अतिरेकी आणि सैन्यात झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. तक गेल्या तीन दिवसांपासून सैन्य या दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. या भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या बातमीनंतर अनेक गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.