Independence Day 2020: स्वातंत्र्य दिनी भारतीय सैन्याच्या जवानांचे जम्मू-काश्मीर मधील गुरेझ सेक्टर येथे ध्वजारोहण (Watch Video)
स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय सैनिकांनी जम्मू काश्मीर येथील गुरेझ सेक्टरमध्ये ध्वजारोहण केले. या क्षणाचा व्हिडिओ ANI वृत्तसंस्थेने ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे.
आज देशभर 74 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय सैनिकांनी जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) मधील गुरेझ सेक्टर (Gurez sector) येथे ध्वजारोहण केले. या क्षणाचा व्हिडिओ ANI वृत्तसंस्थेने ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बँकग्राऊंडला राष्ट्रगीत वाजत आहे. सर्वत्र बर्फ दिसत आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
इंडो तिबेटीयन जवानांनी देखील 14000 फूट उंटीवर असलेल्या पांगाँग त्सो येथे ध्वजारोहण केले आणि भारत माता की जय आणि वन्दे मातरम् च्या घोषणा दिल्या. याचा व्हिडिओ देखील समोर आला होता. (लडाखच्या इंडो तिबेट सीमा जवानांनी 14,000 उंचीवर ध्वजारोहण करुन साजरा केला भारतीय स्वातंत्र्य दिन)
ANI Tweet:
दरम्यान, स्वातंत्र्य दिनी भारतीय लष्करातील श्वान Vida आणि Sophie यांना चीफ ऑफ आर्मी स्टाफ 'Commendation Cards' प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना विविध ऑपरेशनमधील कामगिरीसाठी देण्यात आला आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. ध्वजारोहण करण्याची मोदींची ही सातवी वेळ होती. त्यानंतर त्यांनी देशवासियांशी संवाद साधत आत्मनिर्भर भारताचा नारा दिला. तसंच नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन'ची देखील घोषणा केली. यंदा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावेळी सुरक्षेसाठी लाल किल्ल्यावर मेड इन इंडिया अंतर्गत बनवलेल्या Anti-Drone System चा वापर करण्यात आला होता. लेझर हत्यारं, मायक्रो ड्रोन्स निकामी करण्याची याची क्षमता आहे.